Kishori Pednekar

Kishori Pednekar : डेड बॉडी बॅग खरेदी घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांचा पासपोर्ट EOW कडून जप्त

504 0

मुंबई : सध्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोविड काळातील कथित डेड बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात EOW कडून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांचा पासपोर्ट जमा करण्यात आला आहे. तसेच किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या दोन बँक खात्यांचं स्टेटमेंटही ईओडब्लूला सादर केलं आहे. किशोरी पेडणेकर यांची कोरोना काळातील कथित डेड बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात चौकशी सुरु आहे.

आज त्यांच्या चौकशीचा तिसरा दिवस आहे. कोविड काळात वाढीव दरात डेड बॉडी बॅग खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान अटकेपासून संरक्षण देतानाच तपासाला सहकार्य करण्याचे निर्देश पेडणेकर यांना उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहे. आज चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांचा पासपोर्ट जमा करण्यात आला

काय आहे नेमका घोटाळा?
कोरोना काळात कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांसाठी लागणाऱ्या डेड बॉडी बॅग या जादा दराने खरेदी केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.या प्रकरणात उच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. सोबतच त्यांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

Share This News

Related Post

ajit pawar and supriya sule

Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर

Posted by - April 28, 2024 0
बारामती : बारामतीच्या विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे. सुप्रिया सुळे…
Ravindra Shobhane

Sahitya Sammelan : अमळनेर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड

Posted by - June 25, 2023 0
पुणे : 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) अमळनेर या ठिकाणी पार पडणार आहे. या संमेलनाच्या (Sahitya…
Kirit somayya

Kirit Somaiya : किरीट सोमय्याचे पत्र आले समोर; म्हणाले मी कोणत्याही महिलेसोबत तसं काही केले नाही

Posted by - July 18, 2023 0
मुंबई : भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक व्हिडिओ चॅट समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच…

छगन भुजबळ यांच्या ‘त्या’ वक्तव्याचे पुण्यात पडसाद ; भुजबळांनी माफी मागावी , भाजपची मागणी

Posted by - September 28, 2022 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा ?…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *