इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेले; ‘असा’ घडला घटनाक्रम ?

143 0

विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीत न होताच राज्यपाल निघून गेले आहेत. सभागृहातील घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी भाषण गुंडाळलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई आणि जोतिबा फुलेंचा अपमान केल्याचा ठपका ठेवत राज्यपालांविरोधात सत्ताधारी पक्ष विधीमंडळातआक्रमक झाल्याचं दिसून आलं. पायऱ्यांवर सत्ताधार्यांकडून राज्यपालांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

राज्यपाल आल्यानंतर ‘असा’ घडला घटनाक्रम

राष्ट्रगीतानंतर भाषणाला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांचा उल्लेख केला तेंव्हा ‘शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणाबाजी सुरु झाली.मुख्यमंत्र्यांनी हात वर करुन घोषणा थांबवण्याची विनंती केली.त्यानंतर मग ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देण्यात आल्या.नवाब मलिकांविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. राज्यपालांनी या गोंधळातच भाषण उरकलं आणि फाईल बंद करून निघून गेले.त्यांच्या अनुपस्थितीच राष्ट्रगीत झाले.

महाराष्ट्राच्या विधानसभेचं अर्थसंकल्पी अधिवेशन सुरु होत आहे.3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.
अशातच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांकडून रणनिती आखली जात आहे.

Share This News

Related Post

पुणेकरांसाठी उपयुक्त माहिती : पुणे महापालिकेच्या 80 सेवा आता व्हॉट्सॲपवर ; व्हॉट्सॲपवर सेवा देणारी देशातील पुणे पहिली महापालिका

Posted by - January 11, 2023 0
पुणे : नागरिकांशी संवाद साधणं सोपं व्हावं यासाठी पुणे महापालिकेने सुरू केलेल्या व्हॉट्सॲप बॉट अर्थात माहिती देणाऱ्या स्वयंचलित यंत्रणा प्रणालीवर…
Manoj Jarange

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Posted by - January 16, 2024 0
जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे मुंबई आंदोलनावर ठाम असल्याने, आता सरकारकडून देखील त्यांची मनधरणी केली जात…
Ratnagiri News

Ratnagiri News : ट्रक – दुचाकीच्या भीषण अपघातात 26 वर्षीय इंटिरिअर डेकोरेटरचा दुर्दैवी अंत

Posted by - October 19, 2023 0
रत्नागिरी : सध्या राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तर अपघाताचे हॉटस्पॉट बनला आहे. खेड तालुक्यातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *