Mumbai Goa Highway

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर उड्डाणपूल कोसळला; ‘हा’ आमदार थोडक्यात बचावला

599 0

चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) आज सकाळच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली आहे. चिपळूण इथं एक नाका येथील उड्डाणपूल कोसळला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम या अपघातामधून थोडक्यात बचावले आहेत.

काय घडले नेमके?
चिपळूण इथं गेल्या काही दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावर पुलाचे काम सुरू आहे. आज सकाळी काम सुरू असताना काही भागाला अचानक तडे गेले होते. मात्र दुपारी दोनच्या दरम्यान उर्वरित पुलाचा भाग संपूर्ण कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम अपघातातून थोडक्यात बचावले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Share This News

Related Post

Nagpur

नागपूरमध्ये कार डिव्हायडरला धडकून भीषण अपघात

Posted by - May 23, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील न्यू हायवे स्टार ढाब्यासमोर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले…

मदत व पुनर्वसन विभाग : राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरांमध्ये केंद्र सरकारकडून सुधारणा

Posted by - February 27, 2023 0
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एसडीआरएफ (SDRF) साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय…

सकाळी शरद पवारांना पाठिंबा; रात्री अजित पवारांच्या गटात सामील; आमदार देवेंद्र भुयारांनी काही तासांतच का घेतला यूटर्न ?

Posted by - July 5, 2023 0
मुंबई: अपक्ष आमदार देवेंद्र महादेवराव भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. तसेच अजित पवार यांना…

अनिल परब ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

Posted by - June 21, 2022 0
मुंबई- शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २५ आमदार नॉट रिचेबल झाल्यानंतर शिवसेनेच्या गोटामध्ये भूकंप झाला आहे. त्यातच परिवहन मंत्री अनिल…

वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई ; राज्य सरकारने लागू केला मेस्मा कायदा

Posted by - March 27, 2022 0
राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते,तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी व कामगार यांनी आज रविवारी रात्री १२ वाजल्यापासून दोन दिवसीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *