महाराष्ट्राला पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार

199 0

नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या लाभासाठी जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करणे व या योजनेबाबत जागरुकता निर्माण करण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकाविला.या उपलब्धीसाठी केंद्रीय मत्स्य,पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते आज राज्याला सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालयाच्यावतीने येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित ‘पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी संमेलनात’ हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध राज्यमंत्री डॉ.संजीव कुमार बालियान आणि विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्ये, उद्योजक आणि बँकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेत जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करण्यासाठी व योजनेच्या जागरूकतेकरिता केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी यावेळी देशातील तीन राज्यांना गौरविण्यात आले. यात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला. कर्नाटक राज्याला दुसरा तर उत्तरप्रदेशला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार वितरीत करण्यात आला.

Share This News

Related Post

द्राक्ष व्यापाऱ्याकडील १ कोटींची रक्कम लुटणाऱ्या टोळीला फिल्मी स्टाइलने ८ तासात पोलिसांनी केले गजाआड

Posted by - March 30, 2023 0
सांगलीच्या तासगावमध्ये द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करत एक कोटी दहा लाखांचा रोकड लुटल्याचा प्रकार मंगळवारी घडला होता. सांगली पोलिसांनी तपासाची चक्रे…
Jalna News

Jalna News : जालन्यात मध्यरात्री बस पुलाखाली कोसळून भीषण अपघात

Posted by - September 26, 2023 0
जालना : जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवर (Jalna News) एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एक खाजगी बस पुलाखाली कोसळल्यामुळे हा अपघात…
Jalgaon News

Jalgaon News : कुटुंबाचे आधार हरपले ! देवदर्शनाला जाताना दोघां भावांचा करुण अंत

Posted by - August 27, 2023 0
जळगाव : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शिरसाळा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Jalgaon News) मित्रासोबत…
Yavatmal News

Yavatmal News : ‘त्या’ शिक्षिकेची मृत्यूशी असणारी झुंज अखेर संपली

Posted by - September 29, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये शिकवणी वर्गाकडे निघालेल्या तरूण शिक्षिकेस एका ट्रकने…

साध्या पत्रकाराकडे एवढे पैसे आले कुठून ? संजय राऊतांच्या ईडी कारवाईवर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

Posted by - July 31, 2022 0
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *