मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर आता ‘लालपरी’चं धावणं बंद ! कमी प्रवासी भारमानामुळं एसटी महामंडळाचा निर्णय

442 0

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून आता एसटी महामंडळाच्या साध्या बसेस धावणार नाहीत. कमी झालेलं प्रवासी भारमान आणि टोलचा भार असा दुहेरी फटका बसत असल्यानं एसटी महामंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला. या मार्गावरून आता फक्त शिवनेरी बस चालवण्यात येणार आहेत.

एसटीच्या अनेक साध्या बसेस एक्स्प्रेसवेवरून जात असल्यानं त्याचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसत होता. प्रवासी भारमान कमी होणं आणि टोलचा भार असा दुहेरी फटका एसटी महामंडळाला बसत होता. जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून एसटी बसेस धावत नसल्यानं जवळपास 30 ते 50 टक्के प्रवासी भारमान घटल्याचं सांगितलं गेलं. एसटी महामंडळानं काही दिवसांपूर्वी काढलेल्या परिपत्रकानुसार, आता एसटीच्या साध्या बसेस या जुन्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. याआधी देखील, एसटीच्या साध्या बसेस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून चालवली जात होत्या मात्र काही चालक परस्पर एक्स्प्रेसवरून एसटी चालवत असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर एसटी महामंडळानं हा निर्णय घेतला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, हुबळी, बेंगळुरू, मंगलोर मार्गाकडं जाणाऱ्या सर्व एसटी बसेस आता जुन्या मुंबई-पुणे मार्गे धावणार आहेत.
जुन्या मुंबई-पुणे हायवेवर एका बसला जाता-येता 485 रुपये टोल द्यावा लागतो तर नवीन एक्सप्रेस वेवरून जाण्यासाठी त्याच बसला जाता-येता 675 टोल द्यावा लागतो. त्यामुळं एका बसमागं एका फेरीमागं 190 रुपयांचा भुर्दंड पडत होता. शिवाय नवीन एक्सप्रेसवे वरून जाताना पनवेल ते पुणे या तब्बल 130 किलोमीटर अंतरावर एकही प्रवासी चढउतार होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या तुलनेत जुन्या हायवे वरून जाताना खोपोली, लोणावळा, तळेगाव या ठिकाणी प्रवासी भारमान अधिक असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळं आता एसटी महामंडळानं एक्स्प्रेस वेवरून एसटी बस चालवणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय.

Share This News

Related Post

Nanded Accident

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Posted by - May 24, 2024 0
नांदेड : नांदेडमधून एक भीषण अपघाताची (Nanded Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला…
Satara Accident

Satara Accident : पुणे बंगळुर हायवेवर भीषण अपघात; सख्ख्या भाऊ-बहिणीसह भाच्याचा मृत्यू

Posted by - October 14, 2023 0
सातारा : सातारा (Satara Accident) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड फाटा तालुका कराड या…
Nashik Crime

Nashik Crime : विवाहितेची 2 चिमुकल्यांसह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Posted by - April 28, 2024 0
नाशिक : नाशिकमधून (Nashik Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह शेततळ्यात…

महत्वाची बातमी ! नवाब मलिक आणि अनिल देशमुखांचा अर्ज फेटाळला ! राज्यसभेसाठी मतदान करता येणार नाही

Posted by - June 9, 2022 0
मुंबई- राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला आज मोठा झटका बसला. सध्या तुरुंगात असलेले अनिल देशमुख व नवाब मलिक या राष्ट्रवादी…
Sadabhau Khot

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत लोकसभा लढवण्यासाठी सज्ज,’या’ मतदारसंघातून मागितली उमेदवारी

Posted by - February 24, 2024 0
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी (Sadabhau Khot) जवळजवळ सगळ्याच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *