Exam

खळबळजनक ! अमरावतीमध्ये चक्क भाजपच्या माजी नगरसेवकाने फोडला पेपर

590 0

अमरावती : अमरावतीमधून (Amrawati) शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पेपर फुटीच्या (Paper Leak) घटना काही कमी होताना दिसत नाही आहेत. काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) पदवी परीक्षेत चक्क 300 ते 500 रुपयात मासकॉपी करून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यानंतर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकार ?
अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत उन्हाळी 2023 परीक्षेत विधी अभ्यासक्रमाच्या लॉ ट्रस्ट विषयाच्या चौथ्या सत्राचा मोबाईलद्वारे व्हाट्‌सअपवर पेपर लीक करण्यात आला. धक्कादायक म्हणजे यात एका भाजपच्या (BJP) माजी नगरसेवकाचा हात आहे. गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक प्रणीत सोनी (Praneet Soni), भूषण किसन हरकुट (Bhushan Kisan Harkut), किशोर पिंपळकर (Kishore Pimpalkar) या तिघांना ताब्यात घेतले आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत शनिवारी सकाळी 9 ते 12 या दरम्यान विधी अभ्यासक्रमाच्या लॉ ट्रस्ट विषयाचा फोर्थ सेमिस्टरचा पेपर होता. मात्र, पेपर सुरू होण्यापूर्वीच तो विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर पोहोचला होता. तसेच या विषयाच्या झेरॉक्स सुद्धा या तिघांकडे आढळून आल्या. या प्रकाराची माहिती मिळताच अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालक मोनाली तोटे व अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य भैय्यासाहेब मेटकर तातडीने घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण प्रकरण जाणून घेतले. याप्रकरणी आता परीक्षा खोलीवर ड्युटी बजावणारे व दोषी विद्यार्थ्यांवरही पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

ST Bus

ऐन दिवाळीत होणार प्रवाशांचे हाल; उद्यापासून एसटी कर्मचारी संपावर

Posted by - November 5, 2023 0
  ऐन दिवाळीत एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी…
Nandurbar News

Nandurbar News : नंदुरबारमध्ये जिवाभावाच्या मैत्रिणींचा करुण अंत

Posted by - May 23, 2024 0
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar News) नवापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तालुक्यातील बोरपाडा धरणात जिवलग मैत्रिणींचा…
anil Ramod

Anil Ramod Suspended : अखेर ! लाचखोर अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड निलंबित

Posted by - June 22, 2023 0
पुणे : पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना अखेर निलंबित (Anil Ramod Suspended) करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या वतीने…

पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली ? नवा लेटर बॉंब

Posted by - May 6, 2022 0
पुणे- माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना…

#PUNE : पुणे महापालिका आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रक शहराच्या विकासाला चालना देणारे – जगदीश मुळीक

Posted by - March 24, 2023 0
पुणे : पुणे महापालिका आयुक्ताने सादर केलेले अंदाजपत्रक हे शहराच्या विकासाला चालना देणारे आहे. शहर भाजपने केलेल्या मागणीनुसार कोणतीही करवाढ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *