Eknath Shinde

Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा

431 0

ठाणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर पक्षामध्ये मोठी फूट पडली. यावेळी पक्षाचे दोन गट झाले. एक उद्धव ठाकरे गट आणि दुसरा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचा गट. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर त्यांना शिवसेनेच्या अनेक आमदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर पुन्हा एकदा युतीचं सरकार आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षाचं चिन्ह आणि नावावर देखील दावा करण्यात आला. निवडणूक आयोगानं हा निर्णय शिंदे यांच्या बाजूनं दिल्यामुळे पक्षाचं चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना मिळालं.या उठावाला ज्या ठाण्यातून सुरुवात झाली, त्याच ठाण्यातील एका विवाहाची सर्वत्र चर्चा रंगताना दिसत आहे.

हा विवाह होता आमदार रवींद्र फाटक यांचे स्वीय सहय्यक आणि सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य गावकर आणि उद्धव ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा समन्वयक आरती खळे यांचा. हा विवाह ठाण्यातील घोडबंदर परिसरात पार पडला. या विवाहानिमित्त पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिवसेनेच नेते आणि पदाधिकारी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला

Belgaon News : दारुड्या शब्दावर बंदी आण्यासाठी मद्यपींनी काढला थेट विधान भवनावर मोर्चा

Pune Murder : पुणे हादरलं ! संशयातून मित्रानेच केली मित्राची हत्या

Sunil Kedar : रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी; 21 वर्षांनी लागला निकाल

Latur Accident : लातूरमध्ये ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; 3 शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू

Sakshi Malik Retirement : ऑलिंपिक पदक विजेत्या साक्षी मालिकची कुस्तीमधून निवृत्ती

Share This News

Related Post

JDU-BJP Alliance Broke : “भाजपने आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला”; बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे भाजपवर आरोप

Posted by - August 9, 2022 0
बिहार : पाच वर्षानंतर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू आणि भाजप यांच्यातील युती तुटली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी…
Akola Crime

Akola Crime : अकोल्यातील ‘त्या’ 19 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - August 9, 2023 0
अकोला : अकोला जिल्ह्यात (Akola Crime) 19 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत तरुणी काजल (बदलेलं…
Solapur Accident

Soalpur Accident: बाळूमामांच्या दर्शनाहून परतताना दुर्दैवी अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

Posted by - June 19, 2023 0
सोलापूर : राज्यात अपघाताचे (Soalpur Accident) प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. सांगोला तालुक्यातील आदमापूर येथील मंदिरातून बाळूमामांचे…
Court Bail

Pune Lok Sabha : पुणे लोकसभा पोटनिवडणुक घ्या, मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला आदेश

Posted by - December 13, 2023 0
पुणे : पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 10 महिन्यात काहीच का हालचाली केल्या नाही, खासदारांच्या निधनानंतर…
Raj Thackeray

Mumbai News : 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा; सुप्रीम कोर्टाचे व्यापाऱ्यांना आदेश

Posted by - September 26, 2023 0
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश ( Marathi Shop Signboards) दिले आहेत. प्रकरण उच्च…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *