Prakash-Ambedkar-Uddhav-Thackeray

प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला

519 0

मुंबई : काल मुंबईतील (Mumbai) भांडुपमध्ये वंचित बहुजन आघाडीची (VBA)जाहीर सभा झाली. यावेळी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सावध राहण्याचा सल्लादेखील दिला. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नादी लागू नका, अन्यथा तुमचा राजकीय बळी जाईल. आम्ही शिवसेनेबरोबर जाणार हे आम्ही त्यावेळीच जाहीर केले आहे. मात्र त्यांचा प्रयत्न आहे की यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही (Congress) सोबत यावे. त्यासंदर्भात मी म्हटलं की नाना पटोलेंच्या वक्तव्याकडे लक्ष द्या. राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थिती पाहून ताबडतोब ठाकरे गटाने निर्णय घेतला तर अधिक चांगले आहे, असा सल्लादेखील प्रकाश आंबेडकरांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिला.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवरदेखील निशाणा साधला. ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेतेमंडळींची होत असलेली चौकशी हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी यावेळी आपल्या भाषणामध्ये अधोरेखित केला. राष्ट्रवादीत जयंत पाटलांप्रमाणेच अनेक जणांना जर अल्टिमेटम दिला की ‘आम्ही एकतर तुम्हाला अटक करू किंवा तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा’, तर ते भाजपमध्ये जाण्यासाठी कधीही इच्छुक असतील. ते तुरुंगात जाण्यास इच्छुक नसतील. त्यामुळे सध्याच्या ईडीच्या राजकारणात इथला सगळ्यात कमकुवत राजकीय पक्ष कोणता असेल, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांनादेखील टोला लगावला आहे. नाना पटोलेंची (Nana Patole) वक्तव्य म्हणजे इंग्रजी चित्रपट हॉट अँड ब्लो प्रमाणे कधी गरम तर कधी नरम हवा निर्माण करणारी आहेत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

Share This News

Related Post

शॉपिंग करताना मोबाईल नंबर देण्याची सक्ती नाही, केंद्रीय ग्राहक मंत्रालयाचा मोठा खुलासा

Posted by - May 24, 2023 0
मॉलमध्ये जेव्हा तुम्ही वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्हाला बिलिंग काऊंटरवर बिल Shopping देण्यापूर्वी तुमचा मोबाईल नंबर नक्कीच विचारला जातो. गरज…

चार धाम यात्रा 2023 : ‘या’ दिवशी उघडणारा बद्रीनाथ धामचे दरवाजे, वाचा मुहूर्त आणि बद्रीनाथचे विशेष महत्व

Posted by - January 28, 2023 0
चार धाम यात्रा 2023 : हिंदू धर्मात चारधाम यात्रेला खूप महत्त्व आहे. चार धाम यात्रा दरवर्षी विशिष्ट कालावधीसाठी सुरू होते.…
Bacchu Kadu

Maratha Reservation : मराठा पाकिस्तानचा की अमेरिकेचा? आरक्षणावरून बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया

Posted by - November 2, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : ज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40…

NET, SET, PHD धारक संघर्ष समितीचे प्राध्यापक भरतीसाठीचे आंदोलन; बुद्धिवंतांची मुस्कटदाबी करू नका; आंदोलनकर्त्यांचा निर्वाणीचा इशारा…

Posted by - October 27, 2022 0
पुणे : गेल्या कित्येक वर्षापासून राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची भरती बंद असून त्यामुळे नेट सेट पीएचडी या उच्च पदव्या…

फाल्गुन महिना 2023 : हा मराठी महिना आहे विशेष, फाल्गुन महिन्यात श्रीकृष्णाची पूजा केल्याने साधकांना मिळतो विशेष लाभ

Posted by - February 6, 2023 0
फाल्गुन महिना 2023 : हिंदू कॅलेंडरचा शेवटचा महिना म्हणजेच फाल्गुन महिना आजपासून म्हणजेच 06 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. फाल्गुन महिन्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *