Jalna Dispute

Maratha Reservation : जालन्यात मध्यरात्री पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार राडा

331 0

जालना : जालना जिल्ह्यतून (Maratha Reservation) एक मोठी बातमी समोर आली आहे. बदनापूर तालुक्यतील बुटेगावमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे यांना दारात येण्यास बुटेगावमधील मराठा तरुणांनी मज्जाव केला, त्यानंतर आंदोलक तरुणांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस गावात पोहोचले तेव्हा पोलीस आणि त्या तरुणांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे यांना मराठा समाजाकडून दारात येण्यास बंदी केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी बदनापूर तालुक्यातील बुटेगावात मध्यरात्रीच्या सुमारास जाऊन आंदोलक तरुणांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री एकच्या सुमारास पोलीस गावात पोहोचले. मात्र पोलीस गावात आल्याचं पाहून ग्रामस्थही चांगलेच आक्रमक झाले. मराठा समाजानं पोलिसांच्या या कारवाईला विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली.

आम्ही आमदार किंवा मंत्र्याच्या दारात गेलो नाही, तर ते आमच्या दारात का आले? अगोदर त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली. संपूर्ण गावाने पोलिसांच्या वाहनासमोर आडवे येत, या तरुणांची पोलिसांच्या ताब्यातून सुटका केली. ग्रामस्थ आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनाही या तरुणांना सोडून देत रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 6 जणांचा मृत्यू

Nagpur News : खळबळजनक ! नागपूरमध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Chandrapur News : धक्कादायक ! 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा

Tadasana : ताडासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

अहमदनगर : बीजमाता राहीबाई पोपेरेंनी साकारला अस्सल गावरान बियांचा बाप्पा… पाहा

Posted by - September 1, 2022 0
अहमदनगर : देशभर गणपती बाप्पांचं आगमन मोठ्या जोशात होत असताना, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या राहत्या घरी अस्सल गावठी…
Mansoon

Maharashtra Monsoon : मुंबई, पुण्यासह ‘या’ 7 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Posted by - June 27, 2023 0
मुंबई : मागील तीन दिवसांपूर्वी राज्यात सर्वत्र मान्सूनचे (Maharashtra Monsoon) आगमन झालं आहे. हवामान खात्याकडून (Maharashtra Monsoon) आज आणि उद्या…
Nashik News

Nashik News : 27 वर्षीय विवाहित ‘त्या’ महिला डॉक्टरच्या अपघाताप्रकरणी ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - October 12, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात पुन्हा एकदा खून…
Sharad Pawar

Madha Loksabha : माढ्यामध्ये नवा ट्विस्ट; मोहितेंची एण्ट्री झाल्यास ‘हा’ विश्वासू सोडणार पवारांची साथ?

Posted by - April 13, 2024 0
माढा : लोकसभा निवडणुकीचं (Madha Loksabha) बिगूल वाजलं आहे. प्रचाराची रणधुमाळीसुद्धा सुरु झाली आहे. सर्व नेत्यांकडून आरोप – प्रत्यारोप यांच्या…

आता ओला, उबेरला देखील लागणार प्रवासी वाहतुकीचा पक्का परवाना, अन्यथा…

Posted by - February 15, 2023 0
महाराष्ट्र : ओला ,उबेर या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तात्पुरत्या परवान्याचा स्टेटस को सर्वोच्च न्यायालयाने हटवला आहे. त्यामुळे आता येत्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *