उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला होळी व धुलिवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा

104 0

“समाजातील दुष्प्रवृत्तींचं होळीत दहन होऊ दे, सत्प्रवृत्तींची ज्योत सर्वांच्या हृदयात तेवत राहू दे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

होळीचा सण साजरा करताना समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांनाही आपल्या आनंदात सहभागी करुन घ्या. वृक्षतोड न करता पर्यावरणपुरक होळी साजरी करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार शुभेच्छा संदेशात म्हणाले की, महाराष्ट्राच्या गावखेड्यात, विशेषत: कोकणात साजरा होणारा होळीचा सण यंदाही आनंदात, उत्साहात साजरा होऊ दे. समाजातील अज्ञान, अस्वच्छता, अनिष्ठ रुढी, परंपरांचा विनाश होऊ दे. राज्यातल्या घराघरात, मनामनात ज्ञानाचा प्रकाश उजळू दे.

होळी व धुलीवंदन साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळावा, नैसर्गिक रंगाचा वापर करावा. डोळे व त्वचेला इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी.

कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन सुरक्षित होळी साजरी करा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

Share This News

Related Post

#AJIT PAWAR : रखरखत्या उन्हात 20 हजार आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर; आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन सरकारने प्रश्न सोडवावेत

Posted by - March 14, 2023 0
मुंबई : वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी विज पुरवठा, शेती कर्ज माफी यासह अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका,…

महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी घेतली शरद पवार यांची भेट

Posted by - March 17, 2022 0
मुंबई- महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आमदार रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष…
Sanjay Shirsat

Sanjay Shirsat : संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नये; शिरसाटांची महाजनांवर टीका

Posted by - March 31, 2024 0
नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत सुरु असलेल्या वादात आता भाजपची एन्ट्री होतांना पाहायला मिळत आहे. नाशिक…
Satara News

Satara News : ‘खूप केलं माणसांसाठी आता बस्स’… व्हाट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या

Posted by - June 24, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना (Satara News) घडली आहे. यामध्ये मोबाईल स्टेटसवर स्वतःचा फोटो व त्यावर भावपूर्ण श्रद्धांजली आणि…

आषाढी वारी बाबत मोठी घोषणा, काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?

Posted by - June 6, 2022 0
मुंबई- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. रोज १ हजारांच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *