Eknath Shinde

Dasara : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

217 0

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन आणणारा हा विजयादशमीचा (Dasara) पवित्र सण असून यानिमित्त या निमित्तानं आपण आनंद आणि स्नेहाचं सोनं लुटूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्य शासनाने विविध क्षेत्रात राज्याला देशात आघाडीवर नेणं हेच ध्येय ठेवलं असून आपण आता पुढं निघालो आहोत. राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करुयात असेही मुख्यमंत्री म्हणतात.

‘नऊ दिवस देवी मातेची पूजा केल्यानंतर आता विजयादशमी आली आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा करतो. सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तकं अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचं पूजन करण्यात येते.‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं आपण म्हणतो, कारण खरोखरच हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. आपल्या संस्कृतीत विजयादशमीला खूप महत्त्व आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, दुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे विजयादशमी आहे. वाईट गोष्टींना दूर करून पुढं जाण्याचा हा क्षण आहे. अज्ञानावर ज्ञानानं, शत्रूवर पराक्रमानं, वैऱ्यावर प्रेमानं विजय मिळवायचा असा हा दिवस आहे.साडेतीन मुहुर्तातील एक मुहुर्त म्हणून दसऱ्याच्या मुहुर्तावर आपण नव्या योजनांचा, चांगल्या गोष्टींचा प्रारंभ करुया, असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

Share This News

Related Post

Weather Forecast

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - April 19, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यातील मतदान देशासह राज्याच्याही पाच मतदारसंघांमध्ये पार पडत आहे. यादरम्यान हवामान खात्याने (Weather Update)…

पुणे जिल्ह्यातील मावळ-हवेलीतील 6 बड्या ‘प्लॉट डेव्हलपर’वर गुन्हे दाखल

Posted by - April 12, 2022 0
पुणे जिल्ह्यातील मावळ आणि हवेली तालुक्यात अनधिकृत प्लॉटींग करुन जागामालक व विकसक हे विक्री, विकसनाचे काम करत असल्याचे पुणे महानगर…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! विजतोडणीला स्थगिती देण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश

Posted by - March 15, 2022 0
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज विरोधी पक्षाने शेतकर्‍यांच्या वीज तोडणीचा प्रश्न उचलून धरला आणि त्यावर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी…
Uddhav Thackeray

Maharashtra Politics : ठाकरे गटाचा ‘हा’ मोठा नेता पक्षावर नाराज? कार्यकर्त्यांना केले ‘हे’ भावनिक आवाहन

Posted by - March 9, 2024 0
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली. अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यानं महाविकास…

Breaking News ! नाशिकमध्ये एसटी बसच्या भीषण अपघातात महिला वाहकासह प्रवासी महिलेचा मृत्यू

Posted by - April 7, 2023 0
समोरुन येणाऱ्या वाहनाला चुकवल्यानंतर एसटीचा रॉड तुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि एसटी बस थेट समोरील झाडावर आदळली. हा अपघात आज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *