रश्मी शुक्ला यांना दिलासा; 25 मार्चपर्यंत कुठलीही कारवाई होणार नाही

111 0

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्यानंतर त्यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

बंडगार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल एफआयार रद्द करण्यासाठी शुक्ला यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी रश्मी शुक्ला यांनी न्यायालयात धाव घेतली होती.रश्मी शुक्ला यांनी गुन्हा दाखल होताच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई करु नका, अशा सूचना उच्च न्यायालयानं दिल्या आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख, बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले होते. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना उच्च न्यायालयानं निर्देश दिले आहेत.

Share This News

Related Post

‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

Posted by - September 24, 2022 0
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या कारवाईविरोधात काल संध्याकाळी (शुक‘वार, २३ सप्टेंबर २०२२) पुणे…

#PUNE : छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीचा शासकीय सोहळा साजरा होणार !

Posted by - January 20, 2023 0
पुणे : भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्री.मुरलीधर मोहोळ यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी…

राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; मलीकांना डच्चू तर आव्हाडांचं ‘प्रमोशन’

Posted by - September 16, 2022 0
नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची नवीन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून यात काही नवीन चेहर्‍यांचा समावेश करण्यात आला आहे.…
Suicide

बहिणीच्या लग्नानिमित्त माहेरी गेलेल्या महिलेने 8 वर्षांच्या लेकासह आयुष्य संपवलं

Posted by - May 22, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये चिमुकल्या मुलासह आईने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही…
Warkari in pandharpur

Bakri Eid : ‘यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही’, छत्रपती संभाजीनगरमधील मुस्लिम बांधवांचा मोठा निर्णय

Posted by - June 22, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण सध्या भक्तिमय झाले आहे. यावर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईद (Bakri Eid) एकाच दिवशी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *