सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त;

130 0

केंद्र सरकारनं अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेल आता स्वस्त झाले आहे.

पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता केंद्रा पाठोपाठ राज्यांनींही पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी करावी अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.

एकीकडे महागाईमुळे सामान्य जनता होरपळली जात असताना केंद्राने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पेट्रोलवरील केंद्रीय अबकारी कर हा 8 रुपयांनी तर डिझेलवरील अबकारी कर हा 6 रुपयांनी कमी करण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किमतीमध्ये 9.50 रुपये तर डिझेलच्या किमतीमध्ये 7 रुपयांची घट होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये क्रूड ऑईलच्या  किंमती झपाट्याने खाली येत असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र कमी होत नव्हते. तसेच घरगुती सिलेंडर आणि सीएनजीच्या  किंमती गगनाला भिडल्या होत्या. घरगुती सिलेंडरच्या वाढणाऱ्या दरांबद्दल मध्यमवर्गीय आणि गृहिणी नाराज होत्या. अखेर मोदी सरकारने देशवासियांना मोठा दिलासा देत वर्षाला मिळणाऱ्या बारा सिलेंडर मागे दोनशे रूपयांची सबसीडी देण्याचाही निर्णय घेतला आहे.

Share This News

Related Post

Pune Police Waari

पुणे पोलिसांच्या कॅमेऱ्यातून टिपलेले वारीचे विहंगम दृश्य

Posted by - June 16, 2023 0
पुणे : आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. महाराष्ट्रातील ही वारीची परंपरा वर्षानुवर्षे चालत…

मोठी बातमी! राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष

Posted by - July 3, 2022 0
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर भाजपा व शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपा व शिंदे गटाच्या एकूण…

पुणे : घरगुती सिलेंडरच्या वायु गळतीने घरामधे आग ; महिला जखमी

Posted by - September 27, 2022 0
पुणे : आज पहाटे ०३•०५ वाजता (दिनांक २७•०९•२०२२) नरहे गाव, भैरवनाथ मंदिराजवळ, सोनाई निवास येथे चार मजली इमारत असलेल्या ठिकाणी…

Hussain Dalwai : “शिंदे-फडणवीस सरकार महिलांप्रती काळा कायदा आणू इच्छिते…!”

Posted by - December 15, 2022 0
महाराष्ट्र : महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांची आंतरजातीय अंतर धर्मीय विवाह समन्वय समिती गठीत…
Sharad Pawar Speak

Sharad Pawar On Communal riots : राज्यात धार्मिक दंगली घडत नाहीत, घडवल्या जातात; पवारांचा नेमका कोणावर निशाणा?

Posted by - June 7, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *