Vijay-Wadettiwar

मविआत मोठा भाऊ कोण? वडेट्टीवारांनी दिले स्पष्ट उत्तर

297 0

नागपूर : सध्या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या वाट्याला किती जागा येणार यावर चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून वीस जागांवर दावा करण्यात येणार आहे. मात्र काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे ठेवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी हा महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ आहे असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. अजित पवारांच्या टीकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली होती. काँग्रेस हा नेहमीच मोठा भाऊ राहिला आहे पण आम्ही कधी गर्व केला नाही असे नाना पटोले म्हणाले आहेत. तर तिघांची डीएनए टेस्ट करावी लागेल मग समजेल मोठा भाऊ कोण आणि लहान भाऊ कोण ? अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. यानंतर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार ?
लहान भाऊ मोठा भाऊ या वादात आम्हाला पडायचं नाही. प्रथम तिन्ही भाऊ मिळून शेती चांगली करून, उत्तम नांगरणी करू, पीक चांगल येईल यासाठी प्रयत्न करू. शेतीचा हंगाम चांगला करण्यासाठी चांगलं काम करू, पीक आल्यावर कशी वाटणी करायची हे ठरवू.. असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Share This News

Related Post

Pimpari - Chinchwad

Pimpari – Chinchwad : धक्कादायक! भर पावसात रस्त्यावर आढळले 2 दिवसांचं अर्भक; पिपंरी-चिंचवडमध्ये उडाली खळबळ

Posted by - July 22, 2023 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी -चिंचवडमधून (Pimpari – Chinchwad) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या शहरात (Pimpari – Chinchwad) असलेल्या मरकळगावमधील…
K. Chandrashekar Rao

Telangana Election Result : महाराष्ट्र जिंकायला निघालेल्या ‘राव’ यांच्यावर तेलंगणा गमावण्याची वेळ?

Posted by - December 3, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या आज चार राज्यांची मतमोजणी (Telangana Election Result) होत आहे. या चारही राज्यांपैकी राजस्थान,छत्तीसगड आणि…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाचे 300 फूट उचं टॉवरवर चढून आमरण उपोषण

Posted by - October 25, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील…

प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणावरून भारतावर सायबर हल्ला ; भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक

Posted by - June 14, 2022 0
नवी दिल्ली- ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे पोलिसांची वेबसाईट…
Nagpur News

Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक

Posted by - April 8, 2024 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये काल रात्रीच्या सुमारास नागपुरातील मानकापूर कल्पना टॉकीज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *