दिल्लीतील हस्तकांची महाराष्ट्रात दादागिरी चालू देणार नाही

1137 0

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पोलीस बळाचा वापर करुन सर्वेक्षण केले जात आहे. या पोलीस दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून पोलीस बळावर कोणाचा विकास साधायचा आहे? स्थानिक जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प लादणे ही हुकूमशाही असून कोणत्याही परिस्थिती भाजपा सरकारची ही दादागिरी सहन केली जाणार नाही.

बारसू रिफायनरीसाठी जनतेवर दंडेली कराल तर याद राखा, असा खणखणीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष जनतेच्या हितासाठी नसून शेतकरी, तरुण, महिला, कामगार व जनताविरोधी आहे. विकासाला काँग्रेसचा विरोध नाही पण स्थानिकांना उद्ध्वस्थ करणारा प्रकल्प असेल, स्थानिक जनतेचा त्या प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन संवादातून मार्ग काढला जाऊ शकतो. जनतेच्या मनात जर रिफायनरी प्रकल्पाबाबत काही शंका असतील तर भाजपा सरकार स्थानिक जनतेच्या शंकांचे निरसन का करत नाही? पोलीसांचा फौजफाटा घेऊन कसले सर्वेक्षण करता? ही दादागिरी, हुकूमशाही चालू देणार नाही. आम्ही सर्वजण कोकणातील स्थानिक जनतेच्या बरोबर आहोत.

दिल्लीतील मोदी-शहांचे हस्तक असलेले राज्यातील शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकडे लक्ष देत नाही. बारसू रिफायनरी प्रकल्प पोलीस बळाचा वापर करून लादणाऱ्यांनी हा जोर वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सारखे लाखो तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प गुजरातच्या घशात घालताना का लावला नाही? अशी तत्परता व असाच जोर त्यावेळी दाखवला असता तर महाराष्ट्रातील लाखो तरुणांना रोजगार मिळाले असते पण दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या भाजपाप्रणित शिंदे सरकारने त्यावेळी महाविकास आघाडीवरच खापर फोडले. बारसू रिफायनरीसाठी स्थानिकांना विश्वासात घेऊनच निर्णय झाला पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

Share This News

Related Post

उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांचे मानले आभार म्हणाले,”तुमचं माझ्यावर अजूनही प्रेम…!”वाचा नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे

Posted by - July 8, 2022 0
मुंबई:शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.नुकतीच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.त्यासह देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची…
Manoj Jarange Patil

Manoj Jarange : आरक्षणासाठी दिलेली मुदत संपली; जरांगे पाटलांची पुन्हा उपोषणाला सुरुवात

Posted by - October 25, 2023 0
जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange)…

IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट? फोन टॅपिंग प्रकरणात पुणे पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर

Posted by - October 8, 2022 0
पुणे : पुणे पोलिसांनी एका प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविषयी न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केला. रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध…

ब्रेकिंग न्यूज ! पालघरमध्ये विटाने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात, 2 मजुरांचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

Posted by - April 6, 2022 0
पालघर- भरलेल्या विटांचा ट्रक उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा मृत्यू तर 5 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात…
fire

रत्नागिरीतील लोटे MIDCमध्ये भीषण आग; Video आला समोर

Posted by - May 5, 2023 0
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीधील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. नायट्रिक अ‍ॅसिड गॅस गळती झाल्यामुळे हि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *