कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी ; पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध

136 0

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार दि. २७ ऑगस्टपासून करण्यात येत आहे. मुंबई – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत दि. ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जाहीर केला आहे.

दिनांक २७ ऑगस्ट ते दिनांक ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबई – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राम-४८), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (रा. म. ६६) यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

या टोलमाफी सवलतीसाठी “गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.

पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.

Share This News

Related Post

Nagpur Press Conference : महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होणार का? शरद पवारांचे सूचक वक्तव्य (Video)

Posted by - July 15, 2022 0
नागपूर : शिवसेनेतील बंडा नंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर शिवसेनेसोबत महाआघाडीच्या रूपात सत्तेत सहभागी झालेल्या…

राज ठाकरे यांच्या घराबाहेर कडक सुरक्षा, 75 हजार मनसैनिकांना ‘राज’ आदेश

Posted by - May 3, 2022 0
मुंबई- औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी 4 मे पासून मशिदीवरील भोंगे बंद नाही झाले तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावावी, असे…
Satara News

Satara News : सातारा हादरलं! तरुणाला पेट्रोल अंगावर ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Posted by - June 12, 2024 0
सातारा : साताऱ्यातून एक धक्कादायक घटना (Satara News) समोर आली आहे. जिल्ह्यातील पाटखळ गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये…

‘पुणे-औरंगाबाद अंतर अवघ्या अडीच तासांत गाठणं होणार शक्य’

Posted by - July 14, 2022 0
औरंगाबाद: औरंगाबाद-पुणे या 268 किलोमीटरच्या विशेष महामार्गाचं काम सुरू होणार असून लवकरच सहा पदरी रस्ता सुरू होईल आणि त्याला पुणे,…
Buldhana News

Buldhana News : मित्रांसोबत पिकनिकला गेला आणि जीवानिशी मुकला

Posted by - August 8, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana News) संग्रामपूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *