Manohar Joshi

Manohar Joshi : सुसंस्कृत नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला; मुख्यमंत्री शिंदेंनी मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली

353 0

मुंबई : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले ते 86 वर्षाचे होते. कालच त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ICU मध्ये उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले आणि त्यांना अपेक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी मनापासून योगदान देणारे एक शिस्तबध्द आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.

महाराष्ट्र, मराठी माणसाविषयी त्यांना मनापासून आत्मीयता होती. महाराष्ट्राच्या राजकारणातला अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा ही त्यांची ओळख. सर, अतिशय नम्र, संयमी, हजरजबाबी आणि शिस्तप्रिय होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील त्यांची कामगिरी, योगदान आमूलाग्र बदल घडवणारे होते. शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना तळमळ होती. त्यामुळेच कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना शिक्षणाकडे वळवले.

शिवसेना – भाजप युतीच्या सरकारचे नेतृत्व सरांनी केले. सर्वांना सोबत घेऊन, भूमिकांचा आदर करून वाटचाल करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवरील कामाचा त्यांना दांडगा अनुभव होता. शिवसेनेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो.

आज आपण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला आहे. सरांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत…
भावपूर्ण श्रद्धांजली !

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lasya Nandita : धक्कादायक ! भीषण अपघातात ‘या’ तरुण महिला आमदाराचा मृत्यू

Rajendra Patni : कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

Jitendra Awhad : आमच्या पक्षानं ‘तुतारी’ हे चिन्ह मागितलंच नव्हतं; जितेंद्र आव्हाड यांचा धक्कादायक खुलासा

Solapur Crime : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Share This News

Related Post

Breaking News ! उद्योगपती अविनाश भोसले यांना नजरकैदेत ठेवण्याचा मुंबई सत्र न्यायालयाचा आदेश

Posted by - May 27, 2022 0
मुंबई- पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले यांना काल, गुरुवारी रात्री सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.…
Mumbai High Court

High Court : धाराशिवच्या नामकरणाबाबत उच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - May 8, 2024 0
धाराशिव : उस्मानाबादचं नामकरण धाराशिव तर औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यास राज्य सरकारनं (High Court) परवानगी दिली होती. दरम्यान उस्मानाबादचं…

मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अजित पिंपरीतील सर्व कार्यक्रम रद्द

Posted by - April 22, 2023 0
विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे पिंपरी चिंचवड शहरातील आज सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा राजकिय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *