eknath shinde

मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, राजभवनावर केले इमर्जन्सी लँडिंग

328 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांचे राजभवनावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होण्याची ही काही पहिली वेळ नाही याअगोदरदेखील बुलढाण्याला जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॅाप्टरचे राजभवन हेलिपॅडवर इमर्जन्सी लॅंडिग करण्यात आले.

यावेळी त्या हेलिकॉप्टरमध्ये एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि रोहियो मंत्री संदिपान भूमरे हे होते. हेलिकॅाप्टरच्या ए सी मध्ये बिघाड झाल्यामुळे तो बंद पडला. त्यामुळे हेलिकॅाप्टर पुन्हा राजभवनच्या हेलिपॅडवर उतरविण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सातारा – पाटण दौऱ्यावर आहेत.

हेलिकॉप्टरच्या एसीमध्ये बिघाड झाल्यामुळे ते दुरुस्तीसाठी राजभवनच्या हेलिपॅडवर उतरवले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची दुरुस्ती युद्धपातळीवर केली जात असून लवकरच ते दुरुस्ती होऊन पुन्हा उड्डाण करताना दिसणार आहे.

Share This News

Related Post

Cyclone Michaung

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Posted by - December 5, 2023 0
नागपूर : बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उद्भवलेले चक्रीवादळ मिचॉन्ग (Cyclone Michaung) आज सकाळी 12 वाजण्यापूर्वी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या…

यापूर्वी देखील बेकायदेशीर कामावर कारवाया होतच होत्या पण आधी इतका गाजावाजा नव्हता छगन भुजबळ यांचा किरीट सोमय्या यांना टोला

Posted by - March 27, 2022 0
  शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री अनिल परब याच्या बंगल्यावर हातोडा मारण्यासाठी काल भाजपचे नेते किरीट सोमय्या हे दापोलीत आले…
Yavatmal Accident

Yavatmal Accident : लग्नाच्या स्वागत समारंभावरून परतताना बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Posted by - April 28, 2024 0
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातून (Yavatmal Accident) अपघाताची एक घटना समोर आली आहे. यामध्ये बस आणि आयशर गाडीचा भीषण अपघात झाला…
Maratha Reservation

Maratha Reservation : बीडमधील जाळपोळ, तोडफोड प्रकरणात 6 गुन्हे दाखल

Posted by - October 31, 2023 0
बीड : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाषाण भागातील विविध विकास कामांचं उद्घाटन

Posted by - April 9, 2022 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाषाण भागातील निम्हण मळा ते आयव्हरी इस्टेट ३० मीटर रस्त्याच्या कामाचे तसेच स्मशानभूमी नूतनीकरण आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *