rahul rekhawar

जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे; जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

419 0

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. कोल्हापूरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी निश्चिंत रहावे. नागरिकांनी सोशल मिडियाद्वारे (Social Media) पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Collector Rahul Rekhawar) यांनी केले आहे.

आक्षेपार्ह स्टेटस (Offensive Status) ठेवल्याच्या कारणावरुन कोल्हापूर शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेची पाहणी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली. या पाहणी नंतर कोल्हापूरकरांना आवाहन करताना ते म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच सर्वधर्मसमभावाचा आणि प्रगतशील जिल्हा राहिला आहे. शाहू महाराजांचे कार्य कर्तृत्व आणि त्यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेवून आजवर कोल्हापूर जिल्ह्याने जगाला पुरोगामी आणि आधुनिकतेचा विचार दिला आहे.

जगाला आदर्श विचार देणारा हा संपूर्ण जिल्हा आहे. कोल्हापूरचा सामाजिक क्षेत्रातील ठसा कायम राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन करुन प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीची गय केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी श्री. रेखावार म्हणाले आहेत.

Share This News

Related Post

Garba

Garba : ‘गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या’, विश्व हिंदू परिषदेची मागणी

Posted by - October 10, 2023 0
मुंबई : नागपूरसह राज्यभरात आता गरब्यावरुन (Garba) नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ‘गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश…
Beed News

Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय पेटवलं

Posted by - October 30, 2023 0
बीड : सध्या मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील राजकारण पेटले आहे. मराठा समाजाकडून आता उद्रेक पाहायला मिळत आहे. माजलगावमध्ये ठिकठिकाणी…

कौतुकास्पद : हेच खरे देशप्रेम ; पुण्यातील ‘कीर्तने अँड पंडित’ तर्फे शहरात ध्वज संकलन अभियान

Posted by - August 16, 2022 0
पुणे : ‘कीर्तने अँड पंडित’तर्फे शहरात ‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ ध्वज संकलन अभियान राबविण्यात आलं. स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी…

ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - April 13, 2022 0
मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना आज न्यायालयीन…
Ram Satpute

Ram Satpute : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! राम सातपुतेंना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर

Posted by - March 25, 2024 0
सोलापूर : भाजपने लोकसभेसाठीची आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपने आपल्या धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्रातील युवा नेते राम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *