मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

100 0

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात टिळकांचे स्मरण हे कर्तव्य

मुंबई : “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारतीयांच्या मनामनात स्वराज्याचा हुंकार भरणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे आद्य स्मरण हे आपले कर्तव्य आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमान्य टिळक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

हे हि वाचा : इच्छुकांनो तयारीला लागा! महापालिकांसाठी 29 जुलैला आरक्षण सोडत 

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे सांगत लोकमान्य टिळक यांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य आणि स्वराज्य यांचा हुंकार भरला. त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती आपल्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन,’ असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

हे हि वाचा : राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊसाचा हवामान खात्याचा अंदाज 

Share This News

Related Post

किसान सभेच्या राज्य अधिवेशनात शाळा बंदीच्या निर्णया विरोधात ठराव

Posted by - November 1, 2022 0
पुणे : आज दिनांक २.१०.२०२२ रोजी झालेल्या ग्रामसभेत राज्य सरकारने वीस पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्याबाबतची चर्चा झाली.…
Yavatmal News

Yavatmal News : पोहण्याचा मोह बेतला जीवावर ! वर्धा नदीत बुडून 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - March 9, 2024 0
यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये महाशिवरात्रीच्या यात्रेवरुन घरी परतताना वर्धा नदीत पोहण्यासाठी…
jitendra awhad

‘The Kerala Story’ Movie : जितेंद्र आव्हाडां विरोधात गुन्हा दाखल, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दलचे ‘ते’ वक्तव्य भोवले

Posted by - May 10, 2023 0
मुंबई : सध्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून ( ‘The Kerala Story’ Movie) राज्याचे राजकारण तापताना दिसत आहे. सध्या राज्यातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *