Buldhana Royal Wedding

Buldhana Royal Wedding : बुलढाण्यातील शाही विवाहाची जोरदार चर्चा; माणसांसह पशुपक्षांचीदेखील बसली पंगत

513 0

बुलढाणा : आपल्या मुलीचे लग्न एकदम थाटामाटात पार पडावे अशी प्रत्येक बापाची अपेक्षा असते. आपल्या मुलीच्या लग्नात कसलीच कमी पडू नये, कोणीही उपाशी जाऊ नये असे प्रत्येक बापाला वाटत असते. असाच एक विवाह सोहळा बुलढाणामध्ये पार पडला. या विवाहाची चर्चा संपूर्ण पंचकृषीत रंगली आहे. चला तर मग जाणून घेऊया या लग्नाची विशेष गोष्ट…

बुलढाणा जिल्ह्यातील कोथळी गावातील प्रकाश सरोदे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या एकुलत्या एका मुलीचा विवाह काल पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी चक्क गावालगत पाच एकर शेतात मंडप बांधण्यात आला होता. तसेच या विवाह सोहळ्यासाठी गावाजवळील पाच गावातील सर्वांना या विवाहाचं निमंत्रण देण्यात आले होते. इतकंच काय तर सरोदे यांनी परिसरातील गुरे, पशू पक्ष्यांनादेखील जेवण दिले होते.

यासाठी गायींना दहा क्विंटल ढेप, गुरांना दहा ट्रॉली सुका चारा, परिसरातील श्वानाना पंगत इतकंच काय तर परिसरातील मुंग्या ही उपाशी राहू नये म्हणून मुंग्यांना दोन पोते साखर टाकण्यात आली. या विवाह सोहळ्यात कोणीही उपाशी राहू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती. प्रकाश सरोदे यांनी आपल्या लाडक्या लेकीचा विवाह भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या अतुल दिवाणे याच्याशी केला आहे. या विवाह सोहळ्यात मुक्या प्राण्यांची विशेष काळजी घेतल्याने या सोहळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

Share This News

Related Post

Buldhana Crime

Buldhana Crime : एसटीचा स्टेरिंग रॉड अचानक लॉक अन्… महामंडळाचा भोंगळ कारभार उघड

Posted by - August 16, 2023 0
बुलढाणा : बुलढाणामध्ये (Buldhana Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे (Buldhana Crime) महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा…

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या 3500 विद्यार्थ्यांकडून राष्ट्रगीताचे सामूहिक गायन ! VIDEO

Posted by - August 17, 2022 0
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) ३५०० विद्यार्थ्यांनी आज सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात…
Satara Firing

Satara Firing : सातारा हादरलं ! साताऱ्यात कमानी हौद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार

Posted by - December 28, 2023 0
सातारा : सातारा शहरात (Satara Firing) काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.…
Mumbai Airport Shut

पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल होणार सुरू, वाचा सविस्तर

Posted by - June 29, 2024 0
पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची एक बातमी आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर साकारलेले नवे टर्मिनल लवकरच वापरासाठी खुले होणार आहे. केंद्रीय नागरी हवाई…

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार ; शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Posted by - July 12, 2022 0
मुंबई : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *