Loksabha Election

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT : शिंदेचे खासदार असलेल्या जागेवर भाजपाचा डोळा

551 0

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून नुकतेच लोकसभा आणि विधानसभानिहाय्य निवडणूक प्रमुखांच्या निवडी भाजपकडून करण्यात आल्यात. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत 13 खासदारांच्या जागेवरही भाजपानं निवडणूक प्रमुख नेमल्यानं राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यात नेमके हे 13 खासदार कोण आणि त्यांच्या जागेवर भाजपानं कोणाची लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली पाहूयात…

1) गजानन किर्तीकर: मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार असलेल्या शिवसेना खासदार गजानन किर्तीकरांच्या मतदार संघात भाजपानं आमदार अमित साटम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

2) हेमंत गोडसे: नाशिक खासदार असलेल्या हेमंत गोडसे यांच्या मतदारसंघात भाजपानं केदा नानाजी आहेर यांची नियुक्ती केलीय.

3) संजय मंडलिक : कोल्हापूर मतदार संघाचे खासदार असलेल्या संजय मंडलिकांच्या जागेवर भाजपाकडून राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची निवडणूक प्रमुख निवड करण्यात आली आहे.

4) धैर्यशील माने : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या धैर्यशील मानेंच्या मतदारसंघात सत्यजीत देशमुख यांची नियुक्ती भाजपानं केली

5) राजेंद्र गावीत: पालघरचे खासदार असलेले राजेंद्र गावित यांच्या मतदारसंघात भाजपानं नंदकुमार पाटील यांची लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून भाजपानं निवड केली आहे.

6) श्रीरंग बारणे : मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांच्या मतदारसंघात भाजपानं प्रशांत ठाकूर यांची नियुक्ती केली आहे.

7) श्रीकांत शिंदे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे खासदार असलेल्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजपानं शशिकांत कांबळे यांची नियुक्ती केली आहे.

8) प्रतापराव जाधव: बुलढाणा लोकसभेचे खासदार असलेल्या प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात भाजपानं विजयराज शिंदे यांची नियुक्ती केली आहे.

9) कृपाल तुमाने : रामटेक लोकसभेचे खासदार असलेल्या कृपाल तुमाने यांच्या मतदारसंघात भाजपाकडून अरविंद गजभिये यांची नियुक्ती केली आहे.

10) हेमंत पाटील : हिंगोलीचे खासदार असलेले हेमंत पाटील यांच्या मतदारसंघात भाजपाकडून रामराव वडकुते यांची नियुक्ती केली आहे.

11) सदाशिव लोखंडे: शिर्डी लोकसभेचे खासदार असलेल्या सदाशिव लोखंडेंच्या मतदारसंघात भाजपानं राजेंद्र गोंदकर यांची नियुक्ती केली आहे.

12) भावना गवळी: वाशिम लोकसभेच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांच्या मतदारसंघात भाजपानं नितीन भुतडा यांची नियुक्ती केलीय..

13) राहुल शेवाळे: मुंबई दक्षिण मध्यचे खासदार असलेल्या राहुल शेवाळेंच्या जागेवर भाजपाकडून विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान भाजपानं केलेल्या लोकसभा प्रमुखांच्या निवडीमुळं शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांमध्येही अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे.

रिपोर्टर (संकेत देशपांडे)

Share This News

Related Post

पुणे : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; चारजण जखमी

Posted by - November 30, 2022 0
पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. आज बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एका पिकअप वाहन…
ajit pawar and supriya sule

Ajit Pawar : अजित पवारांनी सुनंदा पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - May 1, 2024 0
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत आहे. या मतदारसंघात शरद पवार आणि अजित…
Missing Children

Missing Children : खेळता खेळता कार लॉक झाल्याने तीन चिमुकल्यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 19, 2023 0
ठाणे : ठाण्यामधून (Thane) एक मन हेलावून टाकणारी घटना (Missing Children) उघडकीस आली आहे. यामध्ये पाचपावली पोलीस ठाण्याच्या (Pachpavali Police…

PUJA CHAVHAN CASE : “संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं अत्यंत दुर्दैवी”..! ; चित्रा वाघ यांचे ट्विट चर्चेत

Posted by - August 9, 2022 0
PUJA CHAVHAN CASE : आज मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला असून संजय राठोड यांना दिल्या गेलेल्या मंत्रीपदावरून भाजप नेत्या चित्रा…

‘मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार, पण…. ‘ उद्धव ठाकरे यांचे बंडखोरांना भावनिक आवाहन

Posted by - June 22, 2022 0
मुंबई- बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रिपदी नको त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ज्यांना मी नकोय,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *