Raju Shetti

राजू शेट्टींचा मतदारसंघ ठरला ! स्वाभिमानी लढविणार लाेकसभेच्या 6 जागा

705 0

पुणे : लोकसभेच्या निवडणूक तोंडावर आल्या आहेत. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या मध्ये महाराष्ट्रात देखील मविआने लोकसभेसाठी कंबर कसली आहे. यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatna) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी देखील लोकसभेच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या सहा जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना लढवणार आहे अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.

सर्वांची ईडी (ED) चौकशी करा. माझ्या चौकशीचा विचार असेल तर त्यासाठी देखील मी तयार आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले आहेत. तसेच लोकसभेत आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही असेदेखील राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

स्वाभिमानी पक्ष हा राज्यभरात सहा ठिकाणी लोकसभा निवडणूक लढणार आहे. यामध्ये राजू शेट्टी हे हातकणंगले मतदारसंघातून लोकसभा लढवणार आहेत. राज्यात एकून 48 लोकसभेच्या जागा आहेत. या जागांवर शिवसेना (Shivsena) आणि भाजपचे (BJP) खासदार आहेत. मात्र 2024 च्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News

Related Post

Maharashtra Weather

Weather Update : पुढील 24 तास खुप महत्वाचे; IMD ने हवामानाबाबत दिला ‘हा’ इशारा

Posted by - May 28, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा (Weather Update) मोठा फटका बसला आहे, अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.…
Solapur News

Solapur News : शाळेजवळ सिमेंटचा बल्कर पलटी झाल्याने एका चिमुकलीसह 4 जणांचा चेंगरून मृत्यू

Posted by - September 1, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Solapur News) एका चिमुकलीसह 4 जणांचा चेंगरून…

‘… तर अनिल देशमुख फरार होतील’, केतकी चितळेची अनिल देशमुख यांच्या विरोधात याचिका

Posted by - June 6, 2022 0
मुंबई- शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली…
Crime News

Crime News : महाराष्ट्र हादरला ! शिक्षकदिनादिवशीच शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

Posted by - September 5, 2023 0
नांदेड : आज देशभरात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. मात्र…

उत्तर प्रदेशात भाजप सुसाट!उत्तर प्रदेशच्या विजयावर भाजपाचा पुण्यात जल्लोष 

Posted by - March 10, 2022 0
उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4 ठिकाणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *