Meghna Bordikar

Meghna Bordikar : आमदार मेघना बोर्डीकर यांना ‘भारत गौरव पुरस्कार’ जाहीर

760 0

परभणी : लंडन येथील भारतीयांच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘भारत गौरव पुरस्कार’ (bharat gaurav award) यंदाच्या वर्षी भाजपच्या (BJP) आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर (Meghna Bordikar) यांना जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनच्या संसदेत हा सन्मान सोहळा पार पडणार आहे. चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, गायत्री परिवाराचे मुख्य चिन्मय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम ब्रिटिश संसदेत पार पडणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यात वेदांता ग्रुपचे सीएमडी डॉ. नरेश त्रेहान, जेट एअरवेजचे अंकित जालान, जिनिव्हा येथील शास्त्रज्ञ सीईआरएन अर्चना शर्मा, पोलंड येथील अमित लाथ यांच्यासह जपान, उझबेकिस्तान, भारत, यूएसए, युके, युरोप, न्यूझीलंड, फ्रान्ससह जगभरातील तब्बल वीस देशातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीयांना हा पुरस्कार ब्रिटिश संसदेत (british parliament) वितरण करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार मागील दहा वर्षांपासून दिला जात आहे. आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या अगोदर हा पुरस्कार आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर, चित्रपट कलाकार मनोज कुमार, नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी, जगातील सर्वात प्रभावशाली महिला श्रीमती इंदिरा नूयी, जैन संत पुलक सागर, आचार्य लोकेश मुनी, गुगलचे सीईओ संजय गुप्ता, दिवंगत मेजर ध्यानचंद, जीमेलचे शिवा अय्यादुराई, स्व. निरजा भानोत, प्रेरक वक्ते गौर गोपालदास, सीमा तापडिया यांना देण्यात आला आहे. आमदार मेघना बोर्डीकर यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने मेघना बोर्डिकर यांचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केले जात आहे. मेघना साकोरे- बोर्डीकर यांना जाहीर झाल्याचे समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे.

Share This News

Related Post

Breaking news ! मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

Posted by - May 19, 2022 0
मुंबई- ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटलेले मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज…

पुण्यात 21 ते 26 एप्रिल दरम्यान रंगणार आंतरराष्ट्रीय रोलबॉल स्पर्धा

Posted by - April 6, 2023 0
पुण्यात श्री शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची तयारी जोरात सुरु असल्याचे स्पर्धा समितीचे…
crime

#NASHIK : घरच्या लग्नाला आले नाहीत म्हणून पत्नी आणि मुलांनी वडिलांनाच संपवले; घटना ऐकून पोलीसही चक्रावले

Posted by - March 20, 2023 0
नाशिक : नाशिकच्या चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरच्या लग्नाला आले नाहीत म्हणून पत्नी आणि…
Manoj Jarange

Manoj Jarange : उपोषणाचा चौथा दिवस ! जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

Posted by - June 11, 2024 0
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मोठा लढा उभारला. त्यांच्या…

‘शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’वर या’ मुख्यमंत्र्यांचा संभाजीराजेंना निरोप; संभाजीराजे पक्षप्रवेश करणार ?

Posted by - May 22, 2022 0
शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’ वर या’ असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना पाठवला आहे. संभाजीराजे आणि शिवसेना नेत्यांमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *