Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबादचे झाले छत्रपती संभाजीनगर; नामकरण फलकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

596 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाने दुमदुमला होता.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे औरंगाबाद येथे आगमन झाले. स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.

यावेळी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव महसुली विभाग, जिल्हा, तालुका, गाव या नामकरण फलकाचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या अनावरणाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला असल्याचे पाहायला मिळाले.

Share This News

Related Post

Corona News

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण

Posted by - December 23, 2023 0
सातारा : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने (Satara News) थैमान घालायला सुरुवात केली आहे. दोन दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात कोरोनाचे…

Lok Sabha Elections : ठाकरे गटाचे स्टार प्रचारकरांची यादी जाहीर; 40 जणांचा समावेश

Posted by - March 30, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी सगळ्या पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेनेही आपल्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली असून…
Crime News

Chhatrapati Sambhajinagar : दुसऱ्याच लग्न जुळवलं मात्र स्वतःच्या लग्नाला मुकला!

Posted by - March 29, 2024 0
छत्रपती संभाजीनगर: बहिणीच्या प्रेम विवाहाला मदत केल्याचा राग डोक्यात ठेऊन भावाने (Chhatrapati Sambhajinagar) 24 वर्षाच्या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली आहे.…

BJP State President Chandrakantada Patil : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा…!

Posted by - July 23, 2022 0
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर त्याग आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार काम…

शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांचं सुचक ट्विट

Posted by - June 29, 2022 0
राज्यातील अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधत आपण मुख्यमंत्रिपदाचा त्या करत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *