Ashish Deshmukh

Ashish Deshmukh : आशिष देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्यावर सोपवण्यात आली ‘ही’ मोठी जबाबदारी

605 0

नागपूर : काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या (Ashish Deshmukh) या प्रवेशानंतर भाजपने त्यांच्यावर भाजपच्या विदर्भाच्या ओबीसी सेलची जबाबदारी सोपवली आहे.

Nalsab Mulla Shot Dead : धक्कादायक ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

आशिष देशमुख काँग्रेसमधून निलंबित
काही दिवसापूर्वी आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपाची काँग्रेस पक्षाने गंभीर दाखल घेऊन त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पण त्यानंतरही आशिष देशमुख सातत्याने काँग्रेस नेतृत्वावर टीका करत राहिले त्यामुळे त्याना काँग्रेस पक्षाने ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित केले होते.

Ration : आता रेशनसाठी दुकानात जाण्याची गरज नाही; शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आशिष देशमुख यांचा राजकीय प्रवास
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे आशिष देशमुख (Ashish Deshmukh) हे पुत्र आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांचे पुतणे.काटोल मतदारसंघातून 2014 ते 2019 या कालावधीमध्ये ते भाजपाचे आमदार होते. पुढं फडणवीस यांच्याशी विदर्भ विकासाच्या मुद्द्यावर मतभेद झाले. ऑक्टोबर 2018 मध्ये त्यानी काटोल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन वर्धा येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये काँग्रेसमध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या विरोधात निवडणूक लढवली. ज्यात त्यांना 59893 मते मिळाली. पण त्यांचा 49344 मतांनी पराभव झाला. दरम्यान आता आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्या भाजपा (BJP) प्रवेशनात पुन्हा एकदा काटोल मध्ये काका पुतण्यांची लढत पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Share This News

Related Post

पुलवामा हल्ल्याप्रकरणी खळबळजनक गौप्यस्फोट करणाऱ्या सत्यपाल मलिकांना सीबीआयची नोटीस

Posted by - April 22, 2023 0
केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीमुळे 2019मध्ये पुलवामा येथे भयंकर दहशतवादी हल्ला होऊन 40 जवान शहीद झाले होते. तसेच जम्मू-कश्मीरातील जलविद्युत प्रकल्प…

ठरलं! 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला होणार

Posted by - April 23, 2023 0
जळगाव: वर्ध्यात 96 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाल्यानंतरच 97 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आणि…
Karad Raut

जत्रेच निमंत्रण जीवावर बेतलं ! जेवणातून विषबाधा होऊन एकाचा मृत्यू

Posted by - June 13, 2023 0
सातारा : कराड तालुक्यातील वहागाव या ठिकाणी काही लोकांना जत्रेचे जेवण महागात पडले आहे. यामध्ये मांसाहारी जेवणातून 23 जणांना विषबाधा…

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची पवनाथडी यात्रेला भेट; समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक-पालकमंत्री

Posted by - December 17, 2022 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर आयोजित पवनाथडी यात्रेला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री…
Govardhan Sharma

Govardhan Sharma : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन

Posted by - November 4, 2023 0
अकोला : भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा (Govardhan Sharma) यांचे काल रात्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *