Marathi Sahitya Sammelan

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनासाठी प्रशासन अलर्टमोडवर; प्रशासनातर्फे समन्वय अधिकारी म्हणून प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची नियुक्ती

479 0

जळगाव : ९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज अमळनेर येथे संमेलनाच्या विविध ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर त्यांनी पीडब्लूडी, तहसील, पाेलीस, एमएसईबी, नगरपालिकेसह संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत जबाबदाऱ्या निश्चित केल्या. संमेलनासाठी प्रशासनातर्फे प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी संमेलनाचा आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन काही सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज प्रताप महाविद्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी अमळेनर येथील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या होत्या. सर्व अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी संमेलनाच्या सर्व कार्यक्रमस्थळांना भेटी देत पाहणी केली.

त्यानंतर प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे झालेल्या बैठकीत कोणत्या विभागाने कोणती कामे करावी, हे निश्चित करुन जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तयारीचा सर्व आढावा घेवून चार दिवसात अहवाल देण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांना दिले.

या बैठकीला संमेलनाचे महाव्यवस्थापक बजरंग अग्रवाल, मराठी वाङ्‌मय मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा. डॉ. पी बी भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, अजय केले यांच्यासह खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माधुरी पाटील, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्यउपाध्यक्ष प्रदिप अग्रवाल, सदस्य हरी वाणी, डॉ. संदेश गुजराथी, कल्याण पाटील, विनोद पाटील, निरज अग्रवाल, योगेश मुंदडे, चिटणिस प्रा. डॉ.ए.बी. जैन, सहचिटणिस प्रा. डॉ. डी. आर. वैष्णव, प्रा. आर. एम. पारधी, विनोद मधुकर पाटील तसेच प्रांताधिकारी महादेव खेडकर, अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे. श्री.गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

ST News : एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सुरु करण्यात येणार ‘ही’ सेवा

Ajit Pawar : ‘जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Bhandara Crime : भंडारा हादरलं ! बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भावाने मर्यादा ओलांडत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Neel Nanda : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे निधन

Ajit Pawar : अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune News : श्रद्धेय अटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी सदैव नम्र असावे! : चंद्रकांत पाटील

Matang : मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणे गरजेचे – रमेश बागवे

IND W Vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

Pune News : कलाकार कट्टा परिसरात ख्रिसमस जल्लोषात साजरी

Amol Kolhe : ‘तुम्ही पालकमंत्री असताना..’ अमोल कोल्हेंचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

Share This News

Related Post

पुणे विमानतळावर उतरताच पर्यटकांसाठी ऐतिहासिक वास्तूकलेचा नजराणा

Posted by - March 10, 2022 0
शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन पुणे विमानतळ प्रशासनाने नव्या विमानतळ टर्मिनलचे प्रवेशद्वार ऐतिहासिक म्हणजेच काही प्रमाणात शनिवार वाड्या प्रमाणेच करण्याचा…

इतर समाजास धक्का न लावतां, आरक्षण देणे.. ही काँग्रेस’ची ‘ओठांत, पोटात व डोक्यात’ एकच् भुमिका”

Posted by - October 29, 2023 0
मराठा आरक्षण हा विषय, भाजप नेतृत्वाचे ठायी मात्र ‘राजकीय कार्यभाग साधण्यापुर्ताच्’ आहे हे सामाजाने लवकरात लवकर ओळखणे हिताचे ठरेल अशी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर ; कसा असेल मोदींचा पुणे दौरा ?..जाणून घ्या

Posted by - March 5, 2022 0
येत्या 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. सकाळी दहा वाजता पुण्यात आल्यानंतर दुपारी तीन वाजता ते…

राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी घेतली नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

Posted by - July 24, 2022 0
नवी दिल्ली: भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांची भेट घेत. राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत…

जागतिक पर्यावरण दिवस ! इतिहास, महत्व आणि 2022 ची थीम जाणून घ्या

Posted by - June 5, 2022 0
5 जून या दिवशी असणारा दिन म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. जागतिक पर्यावरण दिन संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *