AJIT PAWAR

राष्ट्रवादीच्या फक्त त्याच लोकांना विधानसभेचे तिकीट मिळणार; अजित पवारांचे मोठे वक्तव्य

491 0

मुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा सोमवारी वाढदिवस आहे, या निमित्ताने नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली. या पोस्टरमध्ये कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आहे. या सगळ्यावर आता राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमके काय म्हणाले अजित पवार?
यादरम्यान अजित पवार यांनी विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. वरिष्ट नेत्यांनी लोकसभेत जावं असा काही निर्णय झालेला नाही. आम्ही सध्या अंदाज घेत आहोत. सध्या आमचं लोकसभा निवडणुकीकडं लक्ष आहे. जो लोकसभा निवडणुकीत चांगलं काम करेल अशाच लोकांचा विधानसभेच्या तिकीटासाठी विचार होईल असं अजित पवार यावेळी म्हणाले.

भावी मुख्यमंत्र्यावर प्रतिक्रिया
नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लागले म्हणून कोणाला त्रास व्हायचं काही काम नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो म्हणून ते पोस्टर लावतात. मात्र मुख्यमंत्री असंच होता येत नाही. त्यासाठी पक्षाकडे 145 चा आकडा लागतो. ज्या पक्षाकडे हा आकडा आहे, त्यांचा मुख्यमंत्री होतो असे अजित पवार म्हणाले.

Share This News

Related Post

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण : आरोपींवरील अनावश्यक कलमां विरोधात ॲड. असीम सरोदे मैदानात

Posted by - December 12, 2022 0
पुणे : भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती मात्र याप्रकरणी अटक करण्यात…

पिंपरीमध्ये रिक्षाचे भाडे देण्यावरून प्रवाशासोबत वाद; संतापलेल्या रिक्षा चालकाने थेट दगडाने….

Posted by - January 10, 2023 0
पिंपरी : पिंपरीमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. रिक्षाचे भाडे देण्यावरून झालेल्या वादातून रिक्षा चालक आणि संतापून प्रवाशाला थेट दगडाने…
Pune News

Pune Crime News : पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी अपडेट; आता 2 तरुणी ATS च्या रडारवर

Posted by - July 27, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune Crime News) काही दिवसांपूर्वी 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील तिसरा आरोपी कातिल दस्तगीर…

‘असा बदलला भारत’मधून उलगडणार भारताचे अंतरंग

Posted by - October 30, 2022 0
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होऊ घातलेल्या महाग्रंथातून भारताचे अंतरंग उलगणार आहेत. ‘असा बदलला भारत : पारतंत्र्यातून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *