अभिनेता प्रवीण तरडे यांनी मागितले एकनाथ शिंदे यांच्याकडे वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट

151 0

ठाणे – सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस बुधवारी साजरा झाला. या निमित्त आयोजित ‘लोकनाथ’ या गौरव समारंभात अभिनेता प्रवीण तरडे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे रिटर्न गिफ्ट मागितले. शंभर टक्के क्षमतेने नाट्य आणि चित्रपटगृहे खुली करावीत असे मागणे तरडे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘लोकनाथ’ गौरव समारंभ तसेच सत्कार समारंभ ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बॉलीवुड अभिनेता सुनील शेट्टी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, संगीतकार अवधूत गुप्ते, लेखक दिग्दर्शक विजू माने, अभिनेते प्रवीण तरडे उपस्थित होते.

या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आमदार एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाला अनेक लोकं गिफ्ट देतात आणि ज्याचा वाढदिवस असतो तो व्यक्ती लोकांना-मित्रांना रिटर्न गिफ्ट देतो. हाच संदर्भ धागा पकडून अभिनेते प्रवीण तरडे म्हणाले, ” ‘मी संपूर्ण चित्रपट सृष्टीच्या वतीने आणि नाट्यसृष्टीच्यावतीने आपणास वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट मागतोय की, आजपासून पुढे लवकरात लवकर शंभर टक्के क्षमतेने नाट्य आणि चित्रपटगृहे खुली करावीत आणि शंभर टक्के क्षमतेने प्रेक्षकांना बसण्यास परवानगी द्यावी.’ कारण आता आम्हा सर्व कलाकारांचा जीव गुदमरू लागलेला आहे. अनेक प्रतिभावंत आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे शंभर टक्के खुली होण्याची वाट पाहत आहोत.

Share This News

Related Post

Ratnagiri News

Ratnagiri News : रत्नागिरीमध्ये जिलेटीनचा मोठा साठा जप्त; एकाला अटक

Posted by - January 19, 2024 0
रत्नागिरी : रत्नागिरीमधून (Ratnagiri News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रत्नागिरीतील मंडणगड शहरात ट्रॅक्टरमध्ये तब्बल 153 जिलेटिनच्या कांड्या आढळून…
Baramati Died

ट्रॅक्टर अंगावर उलटून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 25, 2023 0
बारामती : पुण्यातील बारामतीमध्ये (Baramati) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्याखाली सापडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…
Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारच्या मृत्यूचे गूढ उकलंल; खून झालेल्या दिवशीचा घटनाक्रम आला समोर

Posted by - June 20, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (MPSC) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ)…
Dombivli Blast

Dombivli Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

Posted by - May 24, 2024 0
डोंबिवली : डोंबिवली कंपनी स्फोट (Dombivli Blast) प्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनीच्या फरार मालक…

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, या भेटीबाबत अमित शाहांचा शेलारांना फोन

Posted by - April 12, 2023 0
शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *