Amol-Mitkari-Jitendra-Awhad

Ajit Pawar : “दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कायम हुजरेच राहतील; मिटकरींची आव्हाडांवर टीका

443 0

मुंबई : काल मंत्रिमंडळाचा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) व प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेले होते. या दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) बोचरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी?
“दादा कालही राजे होते. आजही राजे आहेत आणि उद्याही राजेच राहणार. दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कालही दरबारी हुजरे होते,आजही आहेत, आणि कायमस्वरुपी हुजरेच राहतील… #अंगुरखट्टेहै” अशाप्रकारचे ट्विट करून आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.

Acharya Dhirendra Shastri : आचार्य धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेदरम्यान मुलीला बॅरिकेडवरून फेकलं; Video व्हायरल

Pune PMPML : बस चालकाने अरेरावी केली तर या नंबरवर कॉल करा अन् मिळवा 100 रुपयांचं बक्षीस

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
“छत्रपती शिवाजी महाराज छोट्या साम्राज्याचे राजे होते. दिल्लीत त्यांना 5 हजारांची मनसबदारी दिली, तेव्हा ते ती मनसबदारी लाथाडून महाराष्ट्रात परत निघून आले होते. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. हीच महाराष्ट्राची भूमिका आहे. एक माणूस (Ajit Pawar) जो इथं राजा म्हणून राहत होता, तो दिल्लीला सुभेदार बनायला चालला आहे. मोठ्या राज्यात सुभेदार होण्यापेक्षा, लहान राज्याचा राजा होणं खूप चांगलं आहे.” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.

Share This News

Related Post

Chhatrapati Sambhajinagar Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime : तू मला भेट नाहीतर… रुमवर बोलवून तरुणीवर अत्याचार केले अन्… छत्रपती संभाजीनगर हादरलं !

Posted by - October 12, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.…

अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा कोल्हापूर पोलिसांनी घेतला ताबा

Posted by - April 20, 2022 0
मुंबई – मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केल्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा कोल्हापूर पोलिसांना ताबा मिळालेला आहे.…

विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदानाला सुरुवात

Posted by - July 3, 2022 0
मुंबई: राज्यातील अनेक नाट्यमय घडामोडी नंतर अखेरीस नवीन स्थापन झालेल्या शिंदे सरकारला आज अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागत असून विधानसभा अध्यक्ष…
Sharad Pawar

LokSabha Elections : ‘मविआमध्ये प्रकाश आंबेडकरांना ‘एवढ्या’ जागा देऊ शकतो’; शरद पवारांनी आकडाच सांगितला

Posted by - March 3, 2024 0
पुणे : लोकसभेची निवडणूक (LokSabha Elections) आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्ष लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. भाजपकडून…
Mumbai Pune Highway

Pune News : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर 23 जानेवारीला घेण्यात येणार ब्लॉक

Posted by - January 22, 2024 0
पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास (Pune News) महामंडळामार्फत 23 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 ते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *