80% समाजकारण 20% राजकारण दौरा देखील त्याच धर्तीवर; ‘त्या’ व्हायरल दौऱ्यावर मंत्री तानाजी सावंतांचं स्पष्टीकरण

427 0

पुणे: राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांचा हा पुणे दौरा सोशल मीडियावर चेष्टेचा विषय बनला होता. 

या दौऱ्यात केवळ घर ते कार्यालय आणि सोईनुसार राखीव असा हा दौरा आल्यानंतर  विरोधकांनी देखील मंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीकेची जोड उठवली होती त्यानंतर आता तानाजी सावंत यांनी यासंदर्भात आपले भूमिका मांडली असेल  सावंत म्हणतात दि. २७, २८ रोजी माझा वेळ पुणे येथील कार्यालयांमध्ये राखीव ठेवलेला असल्याकारणाने प्रसारमाध्यमांमध्ये याबद्दल निरनिराळी चर्चा पाहायला मिळाली… बालाजी नगर व कात्रज येथील कार्यालयातूनच आजवर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करण्यात आला, याच कार्यालयातून पूरग्रस्तांसाठी भरभरून मदत पाठवण्यात आले, याच १०×१० च्या खोलीतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांतीचं रोपटं लावण्यात आलं आज त्याचं रूपांतर वटवृक्षात होतं आहे, याच कार्यालयातून स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला गेला, सोमनाथ नाईक च्या उपचारासाठी मदत झाली, याच कार्यालयातून स्व. दिलीप जावळे यांच्या कुटुंबाला मदत झाली, कोविड काळामध्ये देखील एकही दिवस घरामध्ये न बसता रोज नागरिकांसाठी मदत पोहचवली मग त्या मध्ये औषध इंजेक्शन पासून ते ऑक्सिजन सिलेंडर व ड्युरा सिलेंडर पर्यंत मदत देऊ केली… अशी कित्येक कामे या कार्यालयातून झाली आहेत.

पुढे सावंत म्हणाले परमेश्वर कृपेने आजवर मी अनेकांच्या मदतीला पोहचू शकलो कारण घरातून कार्यालयाकडे गेल्यामुळेच…

यापुढे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सन्मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अडलेल्या, नडलेल्या आणि अठरा विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या गरिबांच कल्याण होणार म्हणजे होणार आणि यासाठी ही कार्यालये मध्यवर्ती असतील.

शेवटी सुरेश भट यांच्या शब्दातून हेच सांगेल,

येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो आहे..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही ….

तानाजी सावंत यांचे स्पष्टीकरण खालील लिंकवर 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0oMkvZDz4s39vE6HxjVP7Y2Q4X8K8S1UFbnNupVEvd4WzWSvAcsXdmDRzsSebAxJNl&id=100044334042383

Share This News

Related Post

सांगलीचे खासदार संजय पाटील भाजपाला सोडचिठ्ठी देणार ?

Posted by - March 27, 2022 0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सांगली जिह्ल्याच्या दौऱ्याच्या निमित्ताने तेथील राजकारणातही खळबळ नेहमीप्रमाणे उडाली. खासदार संजय पाटील यांनी येथील  आपली…
Shinde And Ration

Ration : आता रेशनसाठी दुकानात जाण्याची गरज नाही; शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - June 18, 2023 0
मुंबई : मंत्रालयात राज्य सरकारच्या (Shinde Government) पार पडलेल्या बैठकीत रेशन (Ration) वाटपाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या…

मोठी बातमी! माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी

Posted by - October 22, 2022 0
बीड: मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीचं नुकसान झालं आहे. याची पाहाणी करण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार…

‘या’ दिवशी होणार विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी मतदान

Posted by - May 26, 2022 0
मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. 2 जून रोजी…
Sanjay Raut

Sanjay Raut : महाराष्ट्रात शिवसेना मोठा पक्ष म्हणून..; लोकसभेच्या जागा वाटपावर राऊतांनी भूमिका केली स्पष्ट

Posted by - December 29, 2023 0
मुंबई : सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहाता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षाला (Sanjay Raut) कोणत्या आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *