दोन वर्षानंतर प्रथमच बारावी बोर्डची ऑफलाईन परीक्षा

218 0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यातील 9,635 परीक्षा केंद्रावर 14 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनं घेतली जात आहे. या परीक्षेसाठी राज्यातून एकूण 14,85,826 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या राज्यात मुख्य आणि उपकेंद्र मिळून एकूण 9635 परीक्षा केंद्र असतील. आज पहिला सामना विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाशी असणार आहे. यावर्षी खास पेपर लिहताना ऑनलाईन शिक्षणामुळे लिखाणाचा सराव नसल्यानं यावर्षी 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिट तर 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. आजपासून सुरू होणारी बारावी बोर्ड परीक्षा 7 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.

परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीनं मंडळामार्फत संपूर्ण राज्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत.विशेष महिला भरारी पथक आणि काही विभागीय मंडळात विशेष मुख्य अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे.कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाचा पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता ऑफलाइन पद्धतीनं आयोजित परीक्षांसाठी काही महत्त्वाच्या उपाय योजना करण्यात आलेले आहेत.

* नेहमीपेक्षा सुमारे पंधरा दिवस उशिराने परीक्षांचं आयोजन
* शाळा कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर परीक्षा केंद्र उपकेंद्र देण्यात आली आहेत
* 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे
* तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापन याबाबत

आजपासून सुरू होणारी बारावी बोर्ड परीक्षा 7 एप्रिलपर्यंत सुरू राहील

Share This News

Related Post

…तर शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात (व्हिडिओ )

Posted by - January 24, 2022 0
मुंबई- बाबरीनंतर उत्तर हिंदुस्थानात शिवसेनेची एक लहर होती. उत्तरप्रदेश, हरयाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरपर्यंत आम्ही निवडणुका लढवल्या असत्या तर देशात…

मोठी बातमी : दुहेरी हत्याकांड प्रकरणात गँगस्टर छोटा राजनसह अन्य तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता 

Posted by - November 17, 2022 0
मुंबई : २००९ मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात गुरुवारी येथील विशेष सीबीआय कोर्टाने गँगस्टर छोटा राजनसह अन्य तिघांची निर्दोष मुक्तता…

SPECIAL REPORT: क्राईम रिपोर्टर ते शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची धडाधती तोफ;कसा आहे संजय राऊत यांचा राजकीय प्रवास

Posted by - November 15, 2022 0
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेल्या संजय राऊत यांचा आज 61 वा वाढदिवस याच निमित्तानं त्यांच्या कारकीर्दीचा…
Weather Update

Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पाऊसाचे संकट; हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला हायअलर्ट

Posted by - May 5, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका (Weather Update) बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचं आणि…
Vishal Mane

पुण्यात पोलिस कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Posted by - May 26, 2023 0
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police) अंतर्गत असलेल्या भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये (Bhosari MIDC Police Station) कार्यरत असणारे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *