अर्थकारण :पीएफमधून पैसे काढताय? हि माहिती अवश्य वाचा,अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान…

218 0

केंद्र सरकारने सध्या ईपीएफ किंवा पीएफवरून पैसे काढण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.अशा स्थितीत काही जण कोणताही विचार न करता आणि गरज नसतानाही पीएफमधून पैसे काढण्याचा विचार करतात किंवा काढतात देखील.त्यामुळे संबंधिताच्या रिटायरमेंट फंडचे मोठे नुकसान होऊ शकते.  आपणही पीएफमधून पैसे काढण्याचा विचार करत असाल तर थांबा. रिटायरमेंटच्या फंडला किती नुकसान होऊ शकते, हे अगोदर जाणून घ्या.आपले खर्च कमी करा,गरज असल्यावरच पीएफमधून पैसे काढा अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.

आपल्या निधीवर किती परिणाम?
एका अंदाजित आकडेवारीनुसार,आपल्या निवृत्तीला 30 वर्षाचा कालावधी शिल्लक राहत असेल आणि आपण पीएफ खात्यातून 50 हजार रुपये काढले तर रिटायरमेंट फंडवर सुमारे 5 लाख 27 हजार रुपयांचा फटका बसू शकतो.तज्ज्ञांच्या मते,खूपच आर्थिक अडचण आल्याशिवाय पीएफमधून पैसे काढू नयेत.सध्या पीएफवर 8.1 टक्के व्याज मिळत आहे.जेवढी रक्कम पीएफमधून काढली जाईल,तेवढाच परिणाम रिटायरमेंटच्या फंडवर पडेल.

पीएफ किती कापला जातो?
नियमानुसार नोकरदार वर्गांना वेतनाच्या आणि महागाई भत्याच्या 12 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा करणे बंधनकारक आहे.त्याचवेळी कंपनीकडून 2.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये आणि उर्वरित 8.33 टक्के रक्कम ही कर्मचारी पेन्शन योजनेत जमा केली जाते.

मग पैशांसाठी पर्याय काय?
१. सोने तारण कर्ज :बहुतांश बँकांनी पर्सनल गोल्ड लोनची सुविधा सुरू केली आहे.या सुविधेचा लाभ घेत अडचणीच्या काळात सोने तारण ठेऊन कर्ज घेऊ शकतो. एसबीआयकडून या कर्जावर 7.50 टक्के वार्षिक व्याज आकारले जाते.हे कर्ज वीस लाखांपर्यंत मिळू शकते.एसबीआय शिवाय बँक ऑफ इंडिया,पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदासह अन्य बँका देखील सोने तारण कर्ज देतात.
२. मुदत ठेवीवरही कर्ज: मुदत ठेव असेल तर त्यावर देखील कर्ज घेऊ शकता.यावर सहजपणे आणि कमी व्याजदरावर कर्ज मिळू शकते.अनेक बँकांकडून मुदत ठेवीवर 6 टक्क्यांपेक्षा व्याजावर कर्ज मिळते.आपण मुदत ठेवीवर कर्ज घेत असाल तर ठेवीच्या व्याजांपेक्षा एक ते दोन टक्के जादा व्याज द्यावा भरावे लागते. उदाहरणार्थ. आपल्या मुदत ठेवीवर चार टक्के व्याज मिळत असेल तर सहा टक्के व्याजांवर कर्ज मिळू शकते.बँकेच्या नियमानुसार ठेवीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळते. उदा. आपल्या मुदत ठेवीची किंमत दीड लाख रुपये असेल तर 1 लाख 35 हजार रुपये कर्ज मिळू शकते.
३. याखेरीज आपल्या गृहकर्जावर टॉपअप कर्ज घेणे, प्रॉपर्टी लोन घेणे यांसारखे पर्यायही उपलब्ध आहेत.

Share This News

Related Post

शेअर बाजार: क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये गडगडाट;हजारो नोकर्‍या धोक्यात

Posted by - July 11, 2022 0
शेअर बाजार:क्रिप्टो करन्सी मार्केट गेल्या आठ महिन्यांत 2 लाख कोटींपेक्षा अधिक प्रमाणात घटले आहे. बिटकॉइन आणि तिची जवळची प्रतिस्पर्धी असलेली…
September News

September News : 30 सप्टेंबरपूर्वी ‘ही’ कामं करा नाहीतर होईल मोठं नुकसान

Posted by - September 17, 2023 0
सप्टेंबर महिना (September News) संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. देशात सप्टेंबर महिन्यानंतर अनेक बदल पाहायला मिळणार आहे. या महिन्यात…

#INFORMATIVE : डिमॅट आणि ट्रेडिंग खाते म्हणजे काय ? असा ओळखा फरक

Posted by - March 11, 2023 0
शेअरबाजारात गुंतवणूक करायची असेल तर डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट असणे गरजेचे असते. त्याशिवाय आपल्याला इक्विटी मार्केटमध्ये पैसा टाकता येत नाही.…
Bank Holiday

Bank Holiday : ऑक्टोबरमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका; RBI कडून यादी जाहीर

Posted by - September 27, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सप्टेंबर महिना संपत आला असून काही दिवसांनी ऑक्टोबर महिना (Bank Holiday) सुरू होईल. ऑक्टोबर महिन्यात…
RBI

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Posted by - December 6, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इचलकरंजी येथील नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI कडून मोठी कारवाई करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *