Money

Money : 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ 6 नियम

266 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशामध्ये 1 फेब्रुवारी 2024 पासून आर्थिक (Money) बाबींशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होताना दिसणार आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 1 फेब्रुवारीपासून एनपीसी, आयएमपीएस, एसबीआय होम लोन, पंजाब आणि सिंध बँकेची स्पेशल एफडी, एसजीबी यांसह 6 नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे त्याबद्दल आज जाणून घेऊया…

1) फास्टॅग केवायसी
31 जानेवारी 2024 नंतर ज्यांचे केवायसी पूर्ण झालेलं नसेल, असे फास्टॅग बंद किंवा काळ्या यादीत टाकले जातील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाचं उल्लंघन करून एका वाहनाला अनेक फास्टॅग जारी करण्यात येत आहेत. केवायसीशिवाय हे फास्टॅग जारी करण्यात आल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्हीही फास्टॅग केवायसी अपडेट केलं नसेल, तर ते 31 जानेवारीपूर्वी करून घ्यावं.

2) पंजाब आणि सिंध बँक स्पेशल एफडी
पंजाब आणि सिंध बँकेचे ग्राहक 31 जानेवारी 2024पर्यंत ‘धन लक्ष्मी 444 डे’ एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतात. देशांतर्गत मुदत ठेव अकाउंट उघडण्यासाठी पात्र असलेले सर्व निवासी भारतीय, एनआरओ/एनआरई ठेव खातेधारक हे धनलक्ष्मी नावाची स्पेशल एफडी उघडण्यासाठी अर्ज करू शकतात.

3) एसबीआय होम लोन
एसबीआयद्वारे एक विशेष होम लोन मोहीम चालवली जात असून, याअंतर्गत बँकेच्या ग्राहकांना 0.65% पर्यंतच्या गृहकर्जावर सूट मिळू शकते. तसंच प्रक्रिया शुल्क आणि गृह कर्जावरच्या सवलतीची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 असून ही सूट सर्व गृहकर्जांसाठी वैध आहे. हा लाभ 1 फेब्रुवारी 2024 पासून घेता येणार नाही.

4) आयएमपीएस नियम बदलणार
1 फेब्रुवारी 2024 पासून तुम्हाला कोणत्याही लाभार्थीचं नाव न जोडता थेट बँक अकाउंटमध्ये 5 लाख रुपये ट्रान्स्फर करण्याची परवानगी मिळणार आहे.

5) एसजीबी योजना
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2023-24 या आर्थिक वर्षातली सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना (एसजीबी) जारी करणार आहे. एसजीबी 2023-24 मालिका IV म्हणून ती ओळखली जाणार आहे. ही योजना 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होऊन 16 फेब्रुवारी 2024 रोजी बंद होईल.

6) एनपीएसमधून पैसे काढण्याच्या नियमात बदल
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे PFRDA ने नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच एनपीएसमधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हा नवा नियम 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू होणार आहे. नवीन नियमानुसार, एनपीएस खातेधारकाला एकूण जमा झालेल्या रकमेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. यामध्ये खातेदार आणि नियोक्ता दोघांकडून भरण्यात येणाऱ्या रकमेचा समावेश असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र गारठणार ! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात असणार थंडीचा मुक्काम

Blood Donation : सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने खराडीत विक्रमी 3671 जणांचे रक्तदान

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात ‘खेला खोबे’! नितीशकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

Share This News

Related Post

अर्थकारण : पोस्टातील PPF खाते बँकेमध्ये ट्रान्सफर करायचंय ?

Posted by - September 1, 2022 0
अर्थकारण : सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी ( PPF ) हा गुंतवणूकीचा चांगला पर्याय मानला जातो. आपल्या भविष्यातील आर्थिक गरजा आणि आयकरातुन…

नवीन घर खरेदी करताय; तर ही आहे तुमच्या कामाची बातमी

Posted by - June 30, 2023 0
आता घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अडकून पडलेले लाखो गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार निधी देणाऱ्या त्यामुळं घर खरेदी…
RBI

RBI: महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ने केली कारवाई, खात्यातून पैसे काढण्यावर ग्राहकांना बंदी

Posted by - April 9, 2024 0
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून महाराष्ट्र मधील एका बँकेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. RBI ने शिरपूर मर्चंट्स…
ATM

ATM कार्डवर 16 अंकी नंबर कशासाठी असतो? त्या नंबरचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?

Posted by - June 23, 2023 0
सध्या सगळीकडे ऑनलाईनचा जमाना आल्याने सगळे व्यवहार डिजिटल झाले आहेत. त्यामुळे बँकेतून पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या चकरा मारणे बंद झालेला आहे.…

अर्थकारण : तुम्हाला माहित आहे का ? लॉकरमधील दागिन्यांचाही असतो विमा; वाचा सविस्तर प्रकिया

Posted by - October 28, 2022 0
अर्थकारण : सध्या वाढते चोरी आणि दरोड्यांचे प्रमाण पाहता प्रत्येक घराच्या करत्या पुरुषाला आणि गृहलक्ष्मीला काळजी असते ती लॉकर मधल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *