अर्थकारण : विम्यासाठी दावा करताना आवश्य घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

229 0

अर्थकारण : वाहन, आरोग्य, जीवन विमा यासाठीच्या दाव्याच्या प्रक्रिया भिन्न असल्या तरी दोन गोेष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे वेळ आणि अचूकता. एखादी घटना घडल्यानंतर शक्य तितक्या लवकर दाव्याची प्रक्रिया सुरू करावी. दुसरे म्हणजे दाव्यासाठीच्या अर्जात अचुकता असावी. कारण विमा कंपनीला एखाद्या माहितीत त्रुटी आढळून आली तर तो दावा फेटाळला जावू शकतो.

अनेक मंडळी विमा हप्ता नियमितपणे भरतात, जेणेकरून आपल्याला, गाडीला विमा कवच कायम राहवे. परंतु जेव्हा दावा करण्याचा प्रसंग येतो, तेव्हा मात्र विमाधारक गडबडून जातात. अपघातानंतर विमा कंपनीच्या टोल फ्री नंबरवर कॉल करणे, दवाखान्यात भरती होऊन चोवीस तास झाल्यावर विमा प्रतिनिधीला सूचना देणे यासारख्या बाबी चोखपणे पार पाडल्यास दाव्यासाठी अडचणी येत नाही.

नैसर्गिक आपत्तीत आपल्या वाहनाचे किंवा घराचे नुकसान झाल्यास त्याचे फोटो विमा कंपनीला पाठवणे किंवा नजिकच्या पोलिस ठाण्याकडून नुकसानीचा पंचनामा करून घेणे शहाणपणा ठरू शकते. या माध्यमातून आपल्या दाव्याला आणखी बळकटी येते.

आरोग्य विमा दावा प्रक्रिया:
1. कॅशलेस दाव्यासाठी विमा कंपनीला उपचाराची प्राथमिक माहिती द्यावी आणि त्यानंतर हॉस्पिटलकडून फॉर्म भरून रुग्णालयात दाखल करुन घेण्याविषयीचे कागदपत्रे विमा कंपनीकडे सादर करावे. अनेक ठिकाणी विमा कंपनी आणि रुग्णालय यांच्यात करार असतो. त्यामुळे रुग्णालयातच विमा कंपनीचा वेगळा कक्ष असतो. याठिकाणी आपल्या कॅशलेससाठी दावा करावा.
2. कंपनीला आवश्यक असणारे कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. विमाधारकाचे कार्ड, डॉक्टरचे सर्टिफिकेट आदींची पूर्तता करावी लागते.

प्रतिपूर्ती दाव्याचे फायदे:
3. कंपनीला आजाराची माहिती तात्काळ कळवावी आणि ऑफलाइन किंवा ऑनलाइन अर्ज भरावा.
4. उपचाराचा संपूर्ण खर्च मिळण्याचा दावा करावा आणि आवश्यक असणारी माहिती कंपनीला कागदपत्रांसह सादर करावी.
5. उपचारादरम्यान करण्यात आलेल्या चाचण्या, वैद्यकीय तपासणी, शस्त्रक्रिया, औषधी यासंबंधीची कागदपत्रे दाव्यासोबत जोडावीत.
6. ही सर्व कागदपत्रे एकत्र करून कंपनीला तातडीने पाठवण्याची व्यवस्था करावी.

मोटार विमा दावा :
1. मोटार विमा प्रक्रियेत दाव्याचा अर्ज भरा आणि त्यास गाडीच्या आरसी बूकची झेरॉक्स प्रत जोडा. याशिवाय विमाधारकाचा वाहन परवाना आणि पोलिस पंचनाम्याची प्रतही जोडावी. आवश्यकता भासल्यास नुकसानग्रस्त गाडीचे फोटोही अर्जासोबत द्यावेत.
2. दाव्याच्या अर्जात अपघाताची तारीख, वार, वेळ आणि ठिकाण अचूक भरावे. तसेच कोणामुळे, कशामुळे आणि कसा अपघात झाला याचे विवरण असावे. अपघातात अन्य गाडीचाही समावेश असेल तर त्या गाडीचा क्रमांक आणि फोटोही जोडावा.
3. अपघातामुळे गाडीचे किती नुकसान झाले याचा अंदाज द्यावा. गाडीच्या अधिकृत विक्रेत्याकडून किंवा गॅरेजमालकाकडून दुरुस्तीचा आणि नवीन स्पेअरपार्टच्या खर्चाचा तपशील मिळू शकतो.
4. काही प्रकरणात साक्षीदाराचे नाव आणि मोबाईल क्रमांकही अर्जात भरू शकतो. जर एखाद्या मोटार विमा कंपनीला संबंधित घटनेची आणि माहितीची पडताळणी करायची झाल्यास साक्षीदाराशी संपर्क साधून माहिती घेऊ शकते. विमा कंपनीला एखाद्या दाव्याबाबत संशय आल्यास अशा स्थितीत साक्षीदार महत्त्वाची भूमिका बजावतो. व्यवसायिक वाहन असेल तर एफआयआरची कॉपी असणे बंधनकारक आहे.
5. प्रतिपूर्ती दाव्यासाठी वाहनाशी निगडीत असलेले सर्व कागदपत्रे विमा कंपनीला मेलवर किंवा प्रतिनिधीकडे पाठवावीत. जर कॅशलेस सेवा असेल तर सर्व्हिस सेंटर किंवा गॅरेजकडून तातडीने कागदपत्रांची पूर्तता केली जावू शकते.
6. थर्ड पार्टी दाव्यासाठी एफआयआरची कॉपी गाडीच्या कागदपत्रासह मॅक्टकडे पाठवावी.
7. जर गाडीवर दरोडा पडला असेल तर दाव्याचा फॉर्म भरताना आरसी बुक आणि वाहन परवानाची प्रत जोडावी. तसेच एफआयआर आणि आरटीओ ट्रान्स्फर पेपर्सही द्यावेत. कोणत्या ठिकाणी लुटमारीची घटना घडली याची खातरजमा करण्यासाठी एफआयआर महत्त्वाचे कागद महत्त्वाचे असते.

जीवन विमा दावा (मृत्यू प्रकरण)
1. दाव्याचा अर्ज भरा. त्यासोबत मृत्यूप्रमाणपत्र, वारसाप्रमाणपत्र, पॉलिसीचे कागदपत्रे, पॉलिसी क्रमांक, रहिवासी पुरावा, मृत्यूचे कारण आदींचे विवरण सादर करावे. जर अपघाती मृत्यू असेल तर एफआयआरची प्रत आणि पोस्टमार्टेम रिपोर्ट जोडावा.
2. वारसदाराचे बँक खाते क्रमांक, कोरा चेक आदी कागदपत्रांसह विमा कंपनीला दाव्याचा अर्ज सादर करावा.

मुदतीनंतरचा दावा :
1. एखाद्या पॉलिसीची मुदत संपल्यानंतर कंपनी डिस्चार्ज व्हाऊचर विमाधारकाला पाठवते. त्यावर सही करून ती कॉपी परत कंपनीला पाठवावी लागते. कंपनीला डिस्चार्ज व्हाऊचर मिळाल्यानंतर मुदतीनंतरची रक्कम कंपनी विमाधारकाला प्रदान करते. यादरम्यान बँक खाते बदलले असल्यास तशी माहिती कंपनीला सादर करावी.

Share This News

Related Post

अर्थकारण : पोस्टातील PPF खाते बँकेमध्ये ट्रान्सफर करायचंय ?

Posted by - September 1, 2022 0
अर्थकारण : सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी ( PPF ) हा गुंतवणूकीचा चांगला पर्याय मानला जातो. आपल्या भविष्यातील आर्थिक गरजा आणि आयकरातुन…

सोने खरे कि खोटे कसे ओळखावे ? गोल्ड व्हॅल्युअर्स करीता शनीवारी पुण्यात कार्यशाळा , वाचा सविस्तर

Posted by - September 23, 2022 0
पुणे : गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनतर्फे पुणे जिल्ह्यातील गोल्ड व्हॅल्युअर्स करीता शनिवारी पुण्यात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. २४ सप्टेंबर २०२२…

पणन संचालकांच्या हस्ते ॲमेझॉनच्या भाजीपाला संकलन केंद्राचे उदघाट्न

Posted by - July 14, 2022 0
पुणे : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे राज्यातील पाचव्या ॲमेझॉन फळ व भाजीपाला संकलन केंद्राचे राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक सुनील…
EPFO Interest

EPFO Interest : PF खात्यात पैसे कधी येणार? EPFO ने दिली ‘ही’ मोठी अपडेट

Posted by - August 7, 2023 0
कोट्यवधी नोकरदारांच्या पगाराचा काही भाग कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत म्हणजेच त्यांच्या PF खात्यात (EPFO Interest) जमा केला जातो. ईपीएफओ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *