Share Market

Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदाराना झाला मोठा फायदा

415 0

भारतीय शेअर बाजारात (Share Market) आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 19,800 अंकाची पातळी ओलांडली आहे. आज जेव्हा शेअरमार्केट बंद झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 393.69 अंकांनी वधारत 66,473.05 वर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 121.50 अंकांच्या तेजीसह 19,811.35 वर स्थिरावला.

आजच्या व्यवहारात, एफएमसीजी सेक्टरमध्ये झालेल्या खरेदीमुळे निफ्टी एफएमसीजी निर्देशांक 0.85 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. निफ्टी एनर्जी 0.89 टक्के, मेटल, बँकिंग, फार्मा, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, ऑटो सेक्टरमधील शेअर्स तेजीसह बंद झाले. तर आयटी आणि पीएसयू बँक सेक्टरमध्ये घसरण दिसून आली.

आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 24 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली. तर, निफ्टीच्या 50 कंपन्यांपैकी 39 कंपन्यांच्या शेअर्स दरात वाढ दिसून आली.आजच्या व्यवहारात विप्रोच्या शेअर दरात 3.39 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 2.09 टक्के, रिलायन्स 1.62 टक्के, एचयूएल 1.57 टक्के, नेस्ले 1.15 टक्क्यांनी वधारले. एचसीएल टेकच्या शेअर दरात 1.51 टक्क्यांची घसरण दिसून आली. टीसीएस 0.42 टक्के, एसबीआय 0.41 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

Share This News

Related Post

Budget 2024

Budget 2024 : ‘या’ दिवशी सादर होणार अर्थसंकल्प; मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

Posted by - January 11, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर (Budget 2024) करण्यात आल्या आहेत. 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत…

अर्थकारण :पीएफमधून पैसे काढताय? हि माहिती अवश्य वाचा,अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान…

Posted by - July 8, 2022 0
केंद्र सरकारने सध्या ईपीएफ किंवा पीएफवरून पैसे काढण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.अशा स्थितीत काही जण कोणताही विचार न…
KCC

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे ? त्याचा उपयोग काय?

Posted by - November 16, 2023 0
देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाच्या माध्यमातून सरकार अन्न पुरवठादारांना वर्षाला…
RBI

RBI MPC Meet : RBI चं पतधोरण जाहीर

Posted by - February 8, 2024 0
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नव्या वर्षातील पतधोरण जाहीर (RBI MPC Meet) केलं आहे. रिझर्व्ह बँकेची मागच्या तीन दिवसांपासून…
Ajit Pawar

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Posted by - February 27, 2024 0
मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय (Maharashtra Budget 2024) अधिवेशन सोमवारपासून (26 फेब्रुवारी) सुरु झालं आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *