शारदा सहकारी बँक ‘कॉसमॉस’ बँकेत विलीन करण्यास रिझर्व बँक ऑफ इंडियाची मंजुरी

230 0

पुणे: आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या श्री शारदा सहकारी बँकेचे कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत विलीनीकरण, एकत्रीकरणाच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शनिवारी (दि.29) मंजुरी दिली.

शारदा बँकेच्या संचालक मंडळाच्या 27 ऑगस्ट 2021 च्या मासिक बैठकीत कॉसमॉस बँकेत विलीनीकरणाच्या शिफारसीचा ठराव मंजूर करण्यात आला होता. तसेच बँकेची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 29 सप्टेंबर 2021 रोजी झाली आणि त्यामध्येही शारदा बँकेचे कॉसमॉस बँकेत विलीनीकरणाचा ठराव मंजूर करण्यात आला होता. तसेच कॉसमॉस बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही श्री शारदा सहकारी बँक कॉसमॉसमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. कॉसमॉस बँकेने शारदा बँकेंची आर्थिक तपासणीही केली होती. त्यानंतर कॉसमॉस व शारदा बँकेने मिळून एकत्रितरीत्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे विलीनीकरणाचा संयुक्त प्रस्ताव सादर केला होता.

Share This News

Related Post

मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी

Posted by - August 1, 2022 0
मुंबई: गोरेगाव येथील पत्राचाळ जामीन घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संदर्भातील एक मोठी बातमी समोर…
Pankaja Munde

Pankaja Munde : बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी पुण्यात घेतली मुरलीधर मोहोळ यांची भेट

Posted by - March 21, 2024 0
पुणे : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बीडमधून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना…
Eknath Shinde Farm

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळगावी पत्नीसह शेतीकामात व्यस्त

Posted by - June 23, 2023 0
सातारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या सातारा येथील दरे या त्यांच्या मूळ गावी विश्रांतीसाठी आलेले आहेत. दोन…

चिंताजनक : ट्विटर आणि ॲमेझॉननंतर आता गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट देणार १०,००० कर्मचाऱ्यांना नारळ

Posted by - November 22, 2022 0
गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटा ही लवकरच दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याची माहिती समोर येते आहे. तथापि कंपनीने अद्याप…

ईडी कोठडीत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास, जे जे रुग्णालयात दाखल

Posted by - February 25, 2022 0
मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *