RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून महाराष्ट्र मधील एका बँकेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. RBI ने शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्रवर कारवाई केली आहे. बँकेची आर्थिक स्थिती पाहता ही कारवाई करण्यात आल्यामुळे आता शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतून पैसे काढण्यासह अनेक सेवांवर बंदी घातली आहे. तसेच ही बँक आता कोणतीही नवीन कर्ज देऊ शकणार नाही आणि गुंतवणूक देखील करता येणार नाही.
बँकेची आर्थिक स्थिती डगमगली
RBI कडून आयडीएफसी फस्ट बँक आणि एलआयसी हाऊसिंग फायनान्सवरही मोठी कारवाई केल्यानंतर शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्रवर देखील मोठी कारवाई करण्यात आली आहे. या बँकेची आर्थिक स्थिती डगमगल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणालाही या बँकेत गुंतवणूक तसेच पुढील सहा महिने बँकेतून पैसे काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
ग्राहकांच्या पैशांचे काय?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत पैसे जमा केलेले ग्राहक विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर दावा करु शकतात. ज्या ग्राहकांच्या खात्यात 5 लाख रुपयापर्यंत रक्कम असेल त्यांना संपूर्ण पैसे मिळू शकतील. दरम्यान, या बँकेची आर्थिक स्थिती सुधारली जावी म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.