RBI

RBI : निवडणुकीच्या तोंडावर RBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

925 0

देशातील बँकांची बँक अशी ओळख असलेल्या रिझर्व्ह बँक (RBI) ऑफ इंडियाने आपले नवीन पतधोरण जाहीर केलं आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केले नसल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली आहे. त्यामुळे पुढील आढावा बैठकीपर्यंत रेपो रेट 6.50 एवढा राहणार आहे. म्हणजेच देशात लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंतच्या तिहामाहीदरम्यान व्याजदरांत कोणताही बदल होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. म्हणजेच गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आरबीआयने आपल्या पतधोरणामध्ये सलग सातव्यांदा व्याजदर जैसे थे म्हणजेच कायम ठेवले आहेत.

रेपो रेट म्हणजे नेमकं काय?
आरबीआयने ठरवलेल्या रेपो रेटचा थेट परिणाम बँक कर्जावर होतो. बँकांना कर्ज ज्या दराने दिलं जातं त्याला रेपो रेट असं म्हणतात. जेव्हा हा दर म्हणजेच बँकांना व्याज देण्याचा दर कमी होतो तेव्हा कर्ज स्वस्त होते आणि ते वाढल्यानंतर बँका देखील त्यांचे कर्ज महाग करतात. याचा परिणाम होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोन यांसारख्या सर्व प्रकारच्या कर्जांवर होतो आणि कर्जाच्या किंमतीमुळे ईएमआयचा बोजाही वाढतो.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Siddhasana : सिद्धासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

मोठी बातमी! राष्ट्रपतीपदाची निवडणूक आज जाहीर होणार

Posted by - June 9, 2022 0
राष्ट्रपती पदासाठी ची निवडणूक आज जाहीर होणार असून आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोग राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा करणार आहे. राज्यसभा…
OBC Reservation

OBC Reservation : 6 वर्षानंतर ओबीसींच्या आरक्षणाबाबत रोहिणी आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द

Posted by - August 2, 2023 0
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) फायद्यासंबंधित त्रुटी सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या रोहिणी आयोगाने (Rohini Committee) आपला अहवाल आज राष्ट्रपती द्रौपदी…

गोव्यातून भाजपचे विश्वजीत राणे विजयी

Posted by - March 10, 2022 0
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह चार राज्याच्या निवडणुकीच्या निकालासाठी आज प्रत्यक्ष मत मोजणीला सुरुवात झाली आहे. या पाच राज्यातील…

आखाती देशात यंदा प्रथमच महाराष्ट्राची लोककला; दुबईमध्ये 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय लावणी महोत्सव

Posted by - December 9, 2022 0
पुणे : आखाती देशात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संस्कृती व लोककलेची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *