New Rules from 1st October

New Rules from 1st October : 1 ऑक्टोबरपासून ‘या’ नियमांमध्ये होणार बदल; तुमच्या खिशाला लागणार कात्री

1641 0

मुंबई : प्रत्येक महिन्याची एक तारीख खास असते. दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून (New Rules from 1st October) नवीन नियम लागू होतात. या नियमांमुळे बऱ्याच वेळा आपल्या खिशावर कात्री पडू शकते. 1 ऑक्टोबर 2023 पासूनही नवीन नियम लागू होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात ते नियम कोणते आहेत ते…

1) एलपीजी-पीएनजी, सीएनजी गॅसच्या दरात बदल
1 ऑक्टोबरपासून एलपीजी, पीएनजी आणि सीएनजी गॅसच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांकडून दर महिन्याच्या एक तारखेला गॅसच्या दरामध्ये बदल केला जातो.

2) टोल दरात वाढ
मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या पाचही नाक्यांवरील टोल दरामध्ये वाढ करण्यात येणार आहे. मुंबईत सायन-पनवेल महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, एलबीएस मार्ग आणि ऐरोली उड्डाणपूल कॉरिडोअर या पाच एन्ट्री पॉईंटवर टोल वसूल केला जातो. आता 1 ऑक्टोबरपासून या ठिकाणी कारसाठी 5 रुपये तर मिनीबस 10 रुपये, ट्रक आणि बससाठी 20 रुपये अतिरिक्त आकारले जाणार आहेत.

3) बचत योजनांना आधार लिंक करणे आवश्यक
अल्प बचत योजनेच्या विद्यमान ग्राहकांना आपली खाती आधारशी लिंक करावी लागणार आहेत. ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र किंवा पोस्ट ऑफिस प्लॅन यासारख्या लहान बचत योजना सुरू ठेवण्यासाठी आधार क्रमांक प्रदान करणे आवश्यक आहे. अन्यथा 1 ऑक्टोबरपासून तुमचे खाते बंद करण्यात येणार आहे.

4) जन्म प्रमाणपत्र आवश्यक
आता जन्म प्रमाणपत्र हे अनेक गोष्टी सिद्ध करण्यासाठी एकच कागदपत्र असणार आहे. आता नवीन नियमांनुसार जन्म-मृत्यूची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा, 2023 हा 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. या नियमानुसार जन्म-मृत्यूची नोंदणी करणे बंधनकारक होणार आहे. गृह मंत्रालयाने 13 सप्टेंबर रोजी याबाबत अधिसूचना जारी केली होती. शाळांमध्ये प्रवेश, वाहन चालविण्याचा परवाना जारी करणे, मतदार यादी तयार करणे, विवाह नोंदणी, सरकारी नोकरी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पासपोर्ट जारी करणे आणि आधार क्रमांक यासह विविध प्रक्रियेसाठी हे प्रमाणपत्र महत्त्वाचे ठरणार आहे.

5) 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर जाणार
1 ऑक्टोबरपासून चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात चलनातून 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. यानंतर नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.

6) TCS नियम
नवीन TCS नियम 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहेत. आता तुम्ही परदेशात तुमच्या क्रेडिट कार्डवर 7 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास तुम्हाला त्यावर 20 टक्के TCS भरावा लागेल. मात्र, हा खर्च वैद्यकीय किंवा शिक्षणावर असेल तर त्यावर 5 टक्के टीसीएस आकारला जाईल. तुम्ही परदेशात शिक्षणासाठी कर्ज घेतल्यास, 7 लाख रुपयांपेक्षा जास्त मर्यादेवर TCS 0.5 टक्के दराने आकारण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

Top News Informative : राजकीय नेत्यांना घाम फोडणारी ‘ईडी’ नक्की आहे काय ?

Posted by - March 14, 2023 0
महाराष्ट्रात आणि देशभरातच सध्या ईडीच्या कारवायांनी जोर पकडला आहे. भाजप केंद्रिय तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधकांवर दबाव आणत असल्याचे आरोपही…

रघुनाथ कुचिक प्रकरणात पीडितेची पूजा चव्हाण होऊ देऊ नका – चित्रा वाघ

Posted by - March 15, 2022 0
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशासन व पोलिस या प्रकरणात कोणतीही गांभीर्याने दखल घेत…
Pan Card

Pan Card : पॅनकार्ड हरवलंय? नो टेन्शन आता घरबसल्या डाउनलोड होईल E – PAN

Posted by - September 26, 2023 0
आजच्या काळात कोणत्याही आर्थिक कामासाठी पॅन कार्ड (Pan Card) हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. नागरिकांकडे Pan Card असणे अत्यंत…
Raj Thackeray

MNS : लोकसभेच्या रणधुमाळीतून मनसे गायब? मनसे अचानक बॅक फुटवर का गेली?

Posted by - April 3, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *