Pension News

Pension News : पेन्शनधारकांनो लक्ष द्या! लाइफ सर्टिफिकेट जमा झाले तरी स्टेटस तपासून घ्या; नाहीतर पेन्शन होईल बंद

525 0

नोव्हेंबरचा महिना पेन्शनधारकांसाठी (Pension News) अत्यंत महत्त्वाचा असतो. या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत त्यांना आपल्या हयातीत असल्याचा पुरावा (जीवन प्रमाणपत्र) सादर करणे अनिवार्य असते. आपली पेन्शन सुरु राहण्यासाठी हे अनिवार्य असते. जर एखाद्याने पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर केले नाहीतर त्याला पुढील महिन्यापासून म्हणजे डिसेंबरपासून पेन्शन मिळणे बंद होते. जीवन प्रमाण पत्र तुम्ही दोन पद्धतीने सादर करू शकता. एक म्हणजे तुम्ही वैयक्तिकरित्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आणि दुसरी म्हणजे डिजिटल पद्धतीने.

डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सबमिट केल्यानंतर स्टेटस नक्की तपासा
निवृत्ती वेतनधारकांना वर्षातून एकदा त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. या जीवन प्रमाणपत्राची वैधता 12 महिन्यांसाठी असते. 80 वर्षांवरील अतिज्येष्ठ नागरिकांना 1 ऑक्टोबर 2023 ते 10 नोव्हेंबर 2023 दरम्यान जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा देण्यात आली होती, तर 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 दरम्यान जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. तुम्ही जर लाइफ सर्टिफिकेट डिजिटल पद्धतीने सबमिट केले असेल तर त्याची स्थिती एकदा नक्कीच तपासा. डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सबमिट केल्यानंतर स्टेटस चेक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

1) जेव्हा तुम्ही जीवन प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने सबमिट करता तेव्हा तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक संदेश येतो.
2) त्या संदेशात जीवन सन्मान पत्र प्रमाणपत्र आयडीशी संबंधित माहिती आहे.
3) तुमच्या जीवन प्रमाणप्रसि स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रथम https://jeevanpramaan.gov.in/ppouser/login वर लॉग इन करा.
4) जीवन प्रमाणपत्र आयडी आणि कॅप्चा प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
5) यानंतर तुम्हाला प्रमाणपत्राची स्थिती दिसू लागेल.

लाईफ सर्टिफिकेट जमा न झाल्यास काय करावे?
जर तुम्ही डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर केले असेल, परंतु ते जमा झाले नसेल तर घाबरण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत शेवटची तारीख निघून गेल्यानंतरही तुम्ही बँक किंवा भारतीय पोस्ट ऑफिसची मदत घेऊ शकता. तुम्ही तुमच्या बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवरूनही याबाबत माहिती मिळवू शकता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Reliance Jio : 5G सोल्यूशन विकसित करण्यासाठी रिलायन्सचा क्वालकॉमशी करार

Posted by - August 29, 2022 0
मुंबई : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने भारतात 5G नेटवर्कसाठी उपाय विकसित करण्यासाठी क्वालकॉमसोबत भागीदारी केली आहे. रिलायन्स…

नवीन घर खरेदी करताय; तर ही आहे तुमच्या कामाची बातमी

Posted by - June 30, 2023 0
आता घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अडकून पडलेले लाखो गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार निधी देणाऱ्या त्यामुळं घर खरेदी…
UPI Payment

UPI Payment : UPI युजर्ससाठी महत्वाची बातमी ! 31 डिसेंबरच्या आधी करा ‘हे’ काम अन्यथा यूपीआय नंबर होईल बंद

Posted by - November 18, 2023 0
आजकाल सगळीकडे ऑनलाईन पेमेंट (UPI Payment) करण्यात येते. जर तुम्हीदेखील ऑनलाईन पेमेंट करत असला तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नॅशनल…
ITR

ITR : करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 2022- 23 या आर्थिक वर्षाचा आयटीआर भरण्याची डेडलाइन आली जवळ; अन्यथा बसेल दंड

Posted by - July 10, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2022-23 या आर्थिक वर्षाचे आयकर विवरण दाखल (ITR) करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत आहे. आयकर खात्याकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *