KCC

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे ? त्याचा उपयोग काय?

315 0

देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाच्या माध्यमातून सरकार अन्न पुरवठादारांना वर्षाला सहा हजार रुपये देत आहे. त्याचप्रमाणे किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने, ते सबसिडीसह सुलभ कर्ज देत आहे. ही योजना नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने (नाबार्ड) सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बचत खात्याचा लाभही मिळतो. चला तर मग आज आपण हे कार्ड कसे काढावे? त्याला लागणारी कागदपत्रे? आणि त्याचा नेमका उपयोग काय? याबद्दल जाणून घेणार आहोत.

किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे एक प्रकारचे क्रेडिट कार्ड आहे जे शेतकऱ्यांना पीक उत्पादनासाठी, कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी, शेतीसाठी उपयुक्त साहित्य खरेदी करण्यासाठी आणि इतर कृषी संबंधित खर्चासाठी कर्ज देते. हे कर्ज शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतात. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी त्यांच्या कृषी गरजांसाठी विविध आर्थिक सुविधांचा लाभ घेऊ शकतात जसे की खर्चावर बिनव्याजी कर्ज, मर्यादित कालावधीसाठी आणि वाजवी व्याजदरात देते.

या कार्डचा नेमका फायदा काय?
किसान क्रेडिट कार्ड ही योजना सरकारने काही वर्षा पूर्वी सूरू केली आहे. कृषी निगडित वस्तू, बियाणे खरेदी आणि पिकांची लागवड यासाठी जो खर्च होतो त्यासाठी शेतकऱ्यांला कर्ज देण्यात येणार आहे. या कर्जाची रक्कम 1 लाख 60 हजार पासून 3 लाखापर्यंत आहे. याच्यावर व्याजदर फक्त 7 टक्के इतका आहे. आणि परत फेडीचा कालावधी 5 वर्ष इतका आहे. परंतु जर शेतकऱ्याने ते एका वर्षात परतफेड केली तर 3 टक्के इतकी सवलत दिली जाते.

या कार्डसाठी लागणारी पात्रता?
शेतकरी हा किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असावा. त्याला 2000 हजाराचा हप्ता देखील येत असावा. वय 18 ते 75 असावे. शेतकऱ्याने या कार्डसाठी लागणारा अर्ज भरावा. बँकेत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज भरण्यात येतात.

या कार्डसाठी लागणारी कागदपत्रे ?
या कार्डसाठी मोबाईल नंबर,आधारकार्ड, बँक पास बुक, सातबारा एवढी कागदपत्रे लागतात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

#Fire Insurance : उन्हाळ्याचे दिवस आले की अग्निविमा का गरजेचा ? वाचा सविस्तर माहिती

Posted by - February 24, 2023 0
उन्हाळ्याचे दिवस आले की आगीच्या घटना वाढतात, असे मागील काही वर्षांत दिसून आले आहे. अर्थात, आगीची घटना कधीही आणि केव्हाही…

रिलायन्सची दमदार कामगिरी, तिमाहिमध्ये 16 हजार 203 कोटींचा नफा

Posted by - May 7, 2022 0
मुंबई -रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी मार्चअखेर तिमाहीत २२.५ टक्क्यांच्या भरीव वाढीसह, १६,२०३ कोटी रुपयांच्या तिमाही नफ्याची नोंद करणारी आर्थिक कामगिरी…

अकाउंट मधून पैसे कट झाले,परंतु ATM मधून कॅश मिळालीच नाही?वाचा हि महत्वाची माहिती…

Posted by - July 9, 2022 0
एटीएममुळे पैसे काढणे सोयीचे झाले असले तरी तांत्रिक चुकांचा फटका आपल्याला काही वेळा सहन करावा लागतो. अशावेळी एटीएममध्ये सजग राहणे…

उपयोगाची माहिती : सिबिल स्कोअरवर ठेवा लक्ष; क्रेडिट स्कोअर किती असावा ?

Posted by - December 18, 2022 0
अर्थकारण : कोणतेही कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर अर्थात सिबील स्कोअर चांगला असणे गरजेचे आहे. क्रेडिट स्कोअर चांगला राहावा यासाठी त्यावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *