HDFC

एचडीएफसी फायनान्सचे एचडीएफसी बँकमध्ये होणार विलीनीकरण

453 0

नवी दिल्ली- हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आणि एचडीएफसी बँक यांचे विलीनीकरण होत आहे. विलीनीकरणाच्या या करारांतर्गत एचडीएफसी बँकेत 41% वाटा असणार आहे. त्याचप्रमाणे या विलीनीकरणात कंपनीचे भागधारक आणि कर्जदार यांचाही सहभाग असेल. छोट्या आणि मोठ्या गुंतवणूकदारांसाठी हा मोठा निर्णय मानला जात आहे.

पुढील आर्थिक वर्षात दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत प्रक्रिया पूर्ण होईल, असे HDFC बँकेकडून सांगण्यात आले आहे. या नव्या घोषणेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 60 हजाराच्या पलिकडे केला आहे. तर निफ्टीचीही 18 हजाराच्या दिशेने घोडदौड आहे.

HDFC लिमिटेडचे ​​चेअरमन दीपक पारेख म्हणाले की, हे समानांचे विलीनीकरण आहे. आम्हाला विश्वास आहे की RERA च्या अंमलबजावणीमुळे, गृहनिर्माण क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा, परवडणाऱ्या घरांसाठी सरकारी पुढाकार, यासह इतर गोष्टींमुळे गृहनिर्माण वित्त व्यवसायाला मोठी चालना मिळेल.

गृहनिर्माण विकास वित्त निगम (HDFC) बोर्डाने त्यांच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपन्या एचडीएफसी इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड आणि एचडीएफसी होल्डिंग्स लिमिटेडचे एचडीएफसी बँक लिमिटेडमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. एचडीएफसीने सांगितले की, प्रस्तावित व्यवहारामुळे एचडीएफसी बँकेला त्याचा गृह कर्ज पोर्टफोलिओ तयार करता येईल आणि सध्याच्या ग्राहकांना याचा फायदा होईल.

दीपक पारेख पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत बँका आणि NBFCच्या अनेक नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विलिनीकरणाची शक्यता निर्माण झाली. यामुळे मोठ्या ताळेबंदाला मोठ्या पायाभूत सुविधा कर्जाची व्यवस्था करण्याची संधी मिळाली. त्याच वेळी, अर्थव्यवस्थेची पत वाढ वाढली. परवडणाऱ्या घरांना चालना मिळाली आणि कृषीसह सर्व प्राधान्य क्षेत्रांना पूर्वीपेक्षा जास्त कर्ज दिले गेले.

Share This News

Related Post

Narendra Modi

Narendra Modi : आरक्षणाला नेहरुंचा विरोध होता; पंतप्रधान मोदींनी नेहरूंचे ‘ते’ पत्र वाचून दाखवले

Posted by - February 7, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशात अनेक राज्यांमध्ये आरक्षणाचा विषय पेटला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज…

आश्चर्यकारक ! चीनच्या लोकसंख्येत प्रथमच घट ! भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक ?

Posted by - January 19, 2023 0
चीन : जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीनच्या लोकसंख्येत 2022 मध्ये 8 लाख 50 हजार एवढी घट झाली आहे. 1961…
Chandrayaan-3

Chandrayaan-3 : चांद्रयान -3 बरोबर इस्त्रो आणखी ‘या’ 5 मोहिमांवर करत आहे काम

Posted by - July 13, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान – 3 ची (Chandrayaan-3) रंगीत तालीम इस्त्रोने यशस्वी केली आहे. आता केवळ…

देशात १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाला होणार सुरुवात

Posted by - March 14, 2022 0
राज्यभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तिसऱ्या लाटेमुळे केंद्र सरकारने कोविड-19 लसीकरणाचा तिसरा ‘बूस्टर डोस’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. देशात आता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *