Share Market

Share Market : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने उद्या शेअर मार्केट बंद राहणार ?

419 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्या गणेश चतुर्थी असल्याने सगळीकडे धामधूम सुरु आहे. वर्षातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हा सण 19 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल कि गणेश चतुर्थी असल्याने सगळ्यांना सुट्टी असते. त्यामुळे उद्या शेअर मार्केट (Share Market) चालू राहणार कि बंद राहणार? तर आज आपण याबाबदल जाणून घेऊया…

NSE वर उपलब्ध सुट्ट्यांच्या यादीनुसार, गणेश चतुर्थीला शेअर बाजार बंद राहणार आहे. शेअर बाजारात गणेश चतुर्थीची सुट्टी असेल. NSE च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, शेअर बाजार 19 सप्टेंबर 2023 रोजी बंद राहील. याआधी 15 ऑगस्टला शेअर बाजार बंद होता. इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंटमध्ये मार्केटमध्ये कोणताही व्यवहार झाला नाही.

या तारखांना शेअर मार्केट राहणार बंद
शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, गणेश चतुर्थीनिमित्त 19 सप्टेंबर रोजी मार्केट बंद राहणार आहे. यानंतर 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती, 24 ऑक्टोबरला दसरा, 14 नोव्हेंबरला दिवाळी बलिप्रतिपदा, 27 नोव्हेंबरला गुरु नानक जयंती आणि 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या निमित्ताने सेन्सेक्स आणि निफ्टी बंद राहतील. 12 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात फक्त मुहूर्त ट्रेडिंग असेल. मुहूर्ताच्या ट्रेडिंगच्या वेळा नंतर जाहीर केल्या जातील.

Share This News

Related Post

अर्थकारण :पीएफमधून पैसे काढताय? हि माहिती अवश्य वाचा,अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान…

Posted by - July 8, 2022 0
केंद्र सरकारने सध्या ईपीएफ किंवा पीएफवरून पैसे काढण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.अशा स्थितीत काही जण कोणताही विचार न…

अर्थकारण : वापरात नसलेले बँक खाते पुन्हा चालू करायचं आहे ?

Posted by - October 21, 2022 0
दीर्घकाळ एखाद्या बँक खात्यातून व्यवहार झाले नाहीत तर ते खाते इनऑफरेटीव्ह म्हणजे वापरात नसलेले खाते म्हणून ओळखले जाते. सलग दोन…

पुणे : श्री शारदा सहकारी बँकेचे कॉसमॉस बँकेमध्ये विलीनीकरण

Posted by - November 1, 2022 0
पुणे : रिझर्व बँकेने मार्च 2021 मध्ये सहकारी बँकांच्या विलीनीकरणाबाबत परिपत्रक काढले होते त्यानुसार सहकार क्षेत्रातील देशातील कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *