अर्थकारण : Salary Protection Insurance : पगाराला द्या विम्याचे कवच

171 0

अर्थकारण : ‘सॅलेरी प्रोटेक्शन इन्शूरन्स’ ही नोकरदारांच्या कुटुंबांना उपयुक्त ठरणारी विमा योजना आहे. या विमा योजनांमुळे नोकरदाराच्या पश्चात कुटुंबाच्या आर्थिक स्रोतात अडथळा येत नाही. हा विमा कुटुंबाला नियमित उत्पन्न देण्याची सुविधा देतो. पण नोकरी गमावल्यास वेतनाला विमा संरक्षण मिळत नाही. सॅलरी प्रोटेक्शन इन्शूरन्स ही एक प्रकारची टर्म इन्शूरन्स योजना आहे.

एखादा व्यक्ती नोकरदार असेल आणि त्याच्या पश्चात कुटुंबाचा आर्थिक गाडा कसा चालू राहिल, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. एखाद्या नोकरदाराचा अकाली मृत्यू झाला तर त्याला कंपनीकडून पैसे मिळतील याची खात्री नाही. अर्थात त्याच्या सेवाकाळावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. पण आपल्या पश्चात नियमितपणे वेतन कसे मिळत राहिल, याचा विचार मनात आला असेल तर काळजी करण्याचे कारण नाही.

‘सॅलरी प्रोटेक्शन इन्शूरन्स’मुळे भविष्यातील कुटुंबाची चिंता मिटणार आहे. यानुसार आपल्यालनंतरही कुटुंबाला नियमितपणे उत्पन्न मिळत राहिल. अर्थात यात आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, नोकरी गेल्यास या विम्याचा लाभ मिळत नाही. परंतु दुर्देवी घटना झाल्यास आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नाला विमा कवच मिळते.

ही योजना कशी काम करते ?
सॅलरी प्रोटेक्शन विमा ही एकप्रकारची टर्म इन्शूरन्स आहे. त्याची खरेदी करताना आपण दोनपैकी एक पर्याय निवडू शकता. पहिला पर्याय म्हणजे नियमित वेतन घेणे किंवा एकरक्कमी पैसे घेणे असे दोन पर्याय आहेत. नियमित उत्पन्नाचा पर्याय निवडल्यास कुटुंबाला उत्पन्न सुरू राहिल आणि एकरक्कमीचा पर्याय निवडल्यास दुर्देवी घटनेतंतर कुटुंबाला एकदाच सर्व पैसे मिळतील.

आपल्या पश्चात कुटुंबाला किती मंथली इन्कम देऊ इच्छितात याचा पर्याय आपल्याला या योजनेतंर्गत निवडावा लागेल. हे उत्पन्न सध्याच्या टेक होम सॅलरीच्या समकक्ष किंवा त्यापेक्षा कमी राहु शकते. त्यानंतर हप्ता भरणा कालावधी निवडावा लागेल. उदा. आपण वयाच्या तिसाव्या वर्षी हप्ता भरण्याच्या कालावधीसाठी पंधरा वर्ष ठेऊ शकता आणि त्यानुसार पॉलिसी खरेदी करू शकता.

उत्पन्न कोणाला मिळेल ?
विमा कंपनीकडून आपल्याला मासिक वेतनावर उपन्न वाढवून मिळू शकते. म्हणजेच सध्याच्या उत्पन्नावर 6 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजाचा लाभ देण्याचा प्रस्ताव येऊ शकतोे. उदा. पॉलिसी खरेदी करताना 50 हजार रुपये टेक होम सॅलरी असेल आणि मासिक वेतनाचा पर्याय निवडला असेल तर पॉलिसीच्या दुसर्‍या वर्षी हे वेतन 53 हजार रुपये होईल. त्याच्या पुढच्या हेच वेतन 56,180 रुपये होईल. आता गृहित धरा, की पॉलिसी घेऊन पाच वर्ष झाली असतील आणि पाचव्या वर्षाच्या प्रारंभी पॉलिसीधारकाचा मृत्यू होत असेल तर अशावेळी वारसदारास 7.6 लाख रुपये निश्चित लाभ मिळेल आणि वाढीव वेतन 63,124 रुपये मिळेल.

Share This News

Related Post

Budget 2024

Budget 2024 : ‘या’ दिवशी सादर होणार अर्थसंकल्प; मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

Posted by - January 11, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर (Budget 2024) करण्यात आल्या आहेत. 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत…

डेथ इन्शूरन्स क्लेम करताना… ! नियम आणि कायदे

Posted by - September 14, 2022 0
पॉलिसीधारकाच्या निधनानंतर त्याचा वारसदार पॉलिसी फंडसाठी दावा करू शकतो. यासाठी एलआयसीला वारसदाराकडून काही कागदपत्रांची गरज भासते. यासाठी नियम आणि कायदे…

stock market : शेअर बाजारात तेजी ?

Posted by - July 30, 2022 0
stock market :  रशिया-युक्रेन युद्धाची सुरुवात झाल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात मोठी पडझड दिसून आली. भारतीय शेअर बाजारही त्याला अपवाद ठरू…
RBI

RBI: महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ने केली कारवाई, खात्यातून पैसे काढण्यावर ग्राहकांना बंदी

Posted by - April 9, 2024 0
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून महाराष्ट्र मधील एका बँकेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. RBI ने शिरपूर मर्चंट्स…

सोने खरे कि खोटे कसे ओळखावे ? गोल्ड व्हॅल्युअर्स करीता शनीवारी पुण्यात कार्यशाळा , वाचा सविस्तर

Posted by - September 23, 2022 0
पुणे : गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनतर्फे पुणे जिल्ह्यातील गोल्ड व्हॅल्युअर्स करीता शनिवारी पुण्यात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. २४ सप्टेंबर २०२२…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *