अर्थकारण : पोस्टातील PPF खाते बँकेमध्ये ट्रान्सफर करायचंय ?

125 0

अर्थकारण : सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी ( PPF ) हा गुंतवणूकीचा चांगला पर्याय मानला जातो. आपल्या भविष्यातील आर्थिक गरजा आणि आयकरातुन मिळणारी सुट या दोन्हीचा विचार करता सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमधील गुंतवणूक फायदेशीर ठरते. पोस्टामध्ये असलेले पीपीएफचे खाते बँकेमध्ये ट्रान्सफर करण्याची सुविधा आहे. असे केल्याने गुंतवणूकदाराला काही फायदे मिळू शकतात. पोस्टातील पीपीएफ खाते बँकेत ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अत्यत सोपी आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये नियमित गुंतवणूक केल्यास नोकरदाराला आपल्या निवृत्तीनंतर निश्चित उत्पन्नाचा स्त्रोत तयार करता येतो. यातील गुंतवणूकीवर अन्य गुंतवणुकीपेक्षा तुलनेनेे अधिक उत्पन्न मिळते असे दिसून येते. पोस्टातील पीपीएफ खाते आपण बँकेमध्ये ट्रान्सफर केल्यास ते खाते आपण नेट बँकिंगच्या प्रणालीशी जोडू शकतो. पोस्टातील पीपीएफ खात्यात पैसे भरण्यासाठी आपल्याला पोस्टामध्ये जावे लागते त्याचबरोबर आपले पासबुक भरुन घेण्यासाठीही आपल्याला पोस्टात जावे लागते.

आपण पोस्टातील खाते बँकेत ट्रान्सफर केले तर आपल्याला ऑनलाईन पासबुक मिळू शकते. बँकेत पीपीएफचे पैसे भरण्यासाठी स्वत:ला जावे लागत नाही. आपण नेट बँकींग व्दारा आपल्या एका खात्यातून पीपीएफ खात्यात पैसे भरु शकतो. पोस्टातील पीपीएफ खाते बँकेंत ट्रान्सफर करीत असताना बँकेच्या कोणत्या शाखेत पीपीएफ खाती उघडली जातात हे माहित करुन घ्या. सरकारी बँकांच्या सर्वच शांखामध्ये पीपीएफची खाती उघडली जात नाहीत. आपली बँकेची शाखा निश्चित केल्यानंतर गुंतवणूकदाराला एका फॉर्म भरुण द्यावा लागतो तसेच पोस्ट ऑफिसमध्येही आपल्याला ट्रान्सफरसंबंधी फॉर्म सादर करावा लागतो. टपाल खात्याकडे दिलेल्या फॉर्ममध्ये तुम्हाला बँकेच्या कोणत्या शाखेत तुमचे पीपीएफ खाते ट्रान्सफर करायचे आहे याची माहिती भरुन द्यावी लागते. त्या फॉर्मबरोबर पोस्टखात्याकडून मिळलेले पासबुक जोडावे लागते. तुम्ही सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर टपाल खात्याकडून तुमचे पीपीएफ खाते बंद करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानंतर पोस्टाकडून तुमच्या पीपीएफ खात्याबाबतची सर्व कागदपत्रे बँकेकडे पाठविली जातात. असे केल्यानंतर आपले पोस्टातील पीपीएफ खातेबंद घाले असे समजले जाते.

पोस्टातून बँकेकडे आपले पीपीएफ खाते ट्रान्सफर करण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर आपल्याला त्या बँकेत पीपीएफ खाते उघडण्यासाठी जावे लागते. आपले पोस्टातील खाते बँकेत ट्रान्सफर झाल्यानंतर बँकेकडून आपल्याला नवे पासबुक दिले जाते. नव्या पासबुकात पोस्टाकडून ट्रान्सफर झालेला उल्लेख असतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करणे सध्याच्या नोकरदारांच्या दृष्टीने आवश्यक बनले आहे. सरकारी कमर्र्चार्‍यांना निवृत्त झाल्यानंतर सरकारकडून पेन्शन मिळते. मात्र खासगी कंपनीच्या नोकरदारांना निवृत्ती वेतन मिळत नाही. अशा मंडळीना निवृत्तीनंतर निश्चित उत्पनाची काहीच सोय नसते. त्यांच्याकरीता सार्वजनिक भविष्यनिवाह निधीमध्ये गुंतवणूक करणे हा उत्तम पर्याय मानला जातो.

Share This News

Related Post

नवीन घर खरेदी करताय; तर ही आहे तुमच्या कामाची बातमी

Posted by - June 30, 2023 0
आता घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अडकून पडलेले लाखो गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार निधी देणाऱ्या त्यामुळं घर खरेदी…
Gold

Dhanteras: धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल मोठा लॉस

Posted by - November 3, 2023 0
धनत्रयोदशीच्या (Dhanteras) काळात सोने खरेदी करणे भारतात खूप शुभ मानले जाते. याशिवाय सोने ही सुरक्षित गुंतवणूक समजली आहे. अनेक लोक…
Ajit Pawar

Maharashtra Budget 2024 : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाला सुरुवात

Posted by - February 27, 2024 0
मुंबई : राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित…

BSNL ला मागे टाकत Reliance Jio बनली देशातील सर्वात मोठी फिक्स्ड लाइन सेवा प्रदाता कंपनी

Posted by - October 19, 2022 0
खाजगी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने ऑगस्टमध्ये सरकारी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ला मागे टाकून देशातील सर्वात मोठी फिक्स्ड लाइन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *