जागेच्या खरेदीपासून ते पूर्ण बांधकाम होईपर्यंत येणाऱ्या अडचणी ; करारनामा करताना अवश्य जाणून घ्या या गोष्टी

533 0

बांधकाम करताना अनेक अडचणी येतात. त्या प्रत्येक अडचणींबद्दल माहिती घ्यायला हव्यात. खरेदीपासून ते पूर्ण बांधकाम होईपर्यंत ज्या काही अडचणी येतात, त्यांची माहिती असणं आवश्यक असतं. करारनामा करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक ठरतं.

  • बांधकाम करारनामा करताना बांधकामाचे क्षेत्रफळ त्यामध्ये नमूद केलेले असावे.
  • बांधकामाचा दर त्यामध्ये समाविष्ट असला पाहिजे. तसेच दरामध्ये जर वाढ करायची असेल तर ती कोणत्या पद्धतीने करायची व केव्हा करायची यासंबंधी निश्चित मार्गदर्शनपर कलमे.
  • बांधकामाची मुदत, मुदतवाढीची पद्धत याबद्दलची माहिती.
  •  बांधकाम मुदतीत पुर्ण न झाल्यास करणनयात येणारी कारवाई.
  •  बांधकामाचा दर्जा, बांधकामाच्या साहित्याचा दर्जा यासंबंधीची कलमे करारनाम्यात असणे आवश्यक आहे.
  • बांधकामास विलंब झाल्याने पेनल्टी लावायची असल्यास त्यासंबंधी कलमे.
  • बांधकामाचे पैसे अदा करण्याच्या पध्दती व त्यांचा तपशील.
  • आवश्यक ते परवाने, पाणी व्यवस्था, सामान ठेवण्याबाबतची व्यवस्था इ. सर्व गोष्टींचा उहापोह या करारनाम्यात आला पाहिजे.
  • करारनामा रद्द करण्याच्या पद्धती, कोणत्या कारणास्तव करारनामा रद्द करता येईल यासंबंधीच्या अटी शर्ती.
  • करारनामा रद्द झाल्यास पैसे जमा करण्याविषयीच्या अटी व शर्ती.
  • लवादाचे कलम उभय पक्षकारांना आवश्यक वाटले तर घालणे.
  • व्यक्तिगत सभासदांचे सहकार्य, त्यांच्याविषयीच्या अटी व शर्ती.
  • प्रत्येक सदनिकेत कोणत्या सुखसोयी करुन देणार याची यादी. ती यादी सदनिकेबरहुकूम असावी.
  • याशिवाय अन्य काही सुविधा बांधकाम कंत्राटदार देणार असेल तर त्याचादेखील उल्लेख आला पाहिजे. उदा. सोसायटीच्या कार्यालयाला एखादी खोली बांधून देणार असेल तर, एखादी पंप रुम बांधून देणार असेल तर, कंपाऊंड वॉल बांधून देणार असेल तर इ.
  • याप्रमाणे करारनामा साक्षीदारांसमक्ष सह्या करुन घेणे आवश्यक आहे.
  • शक्यतो अशा प्रकारचा करारनामा काम झाल्यानंतर रद्दबातल ठरतो. त्यामुळे पुष्कळजण तो रजिस्टर करीत नाहीत. परंतु थोडा खर्च आला तरी हरकत नाही, पण अशा प्रकारचा करारनामा रजिस्टर करुन घेण इष्ट होय.
Share This News

Related Post

राज्यात ऑक्टोबरमध्ये २१ हजार बेरोजगार उमेदवारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Posted by - November 18, 2022 0
मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये…
Tesla Car

Tesla Office Pune Details : टेस्लाचं पहिलं ऑफिस पुण्यात होणार ! कुठे अन् किती असेल ऑफिसचं भाडं

Posted by - August 3, 2023 0
पुणे : जगप्रसिद्ध टेस्ला कारची निर्मिती करणारी टेस्ला (tesla) कंपनीने भारतात पाऊल ठेवण्याचे ठरवले आहे. यासाठी त्यांनी भारतात पहिलं कार्यालय…

#MAHARASHTRA : अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून ; 9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

Posted by - February 8, 2023 0
मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24…
Ajit Pawar

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Posted by - February 27, 2024 0
मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय (Maharashtra Budget 2024) अधिवेशन सोमवारपासून (26 फेब्रुवारी) सुरु झालं आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *