Debit Card

Debit Card : 31 ऑक्टोबरनंतर ‘या’ सरकारी बँकेचे Debit Card होणार बंद; ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे

1429 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या काळात डेबिट कार्डचा (Debit Card) वापर जवळपास प्रत्येकजण करत असतो. आता 31 ऑक्टोबरला एका सरकारी बँकेचं डेबिट कार्ड हे बंद होणार आहे. सरकारी बँक BoI मध्ये अकाउंट असणाऱ्या ग्राहकांचं डेबिट कार्ड पूर्णपणे निरुपयोगी होणार आहे. बँक ऑफ इंडियाने याविषयी ट्विट करून याची माहिती दिली आहे. 31 ऑक्टोबरनंतर ग्राहक त्यांच्या एटीएम कार्डमधून कोणताही व्यवहार करू शकणार नाहीत किंवा पैसे काढू शकणार नाहीत.

बँक ऑफ इंडियाने काय लिहिले ट्विटमध्ये?
बँक ऑफ इंडिया (BOI) ने ट्विटमध्ये लिहिले आहे की प्रिय ग्राहक, रेग्युलेटरी गायडलाइन्सनुसार डेबिट कार्ड सेवांचा लाभ घेण्यासाठी व्हॅलिड मोबाइल नंबर अनिवार्य आहे. बँकेने ग्राहकांना विनंती केली आहे की, त्यांनी कृपया त्यांच्या शाखेला भेट द्यावी आणि डेबिट कार्ड सेवा बंद होऊ नये म्हणून 31.10.2023 पूर्वी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट/रजिस्टर करावा.

तुम्ही देखील बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर लगेच जा आणि बँकेशी संपर्क साधा. याशिवाय, तुम्हाला भविष्यातही बँकेचे डेबिट कार्ड वापरायचे असेल, तर उशीर न करता शाखेत जाऊन तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर करुन घ्या. अन्यथा, तुम्ही कार्डद्वारे पैसे काढू शकणार नाही किंवा इतर कोणताही ट्रांझेक्शन करू शकणार नाही.

Share This News

Related Post

Rahul Kalate

Rahul Kalate : राहुल कलाटे यांनी घेतली उदय सामंत यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

Posted by - June 23, 2023 0
पिंपरी: उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) गुरुवारी दि. 22 जून रोजी पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchwad) महापालिकेत आले होते. यावेळी ठाकरे गटाच्या…

पिंपरी महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांचा राजीनामा

Posted by - March 4, 2022 0
पिंपरी- महापालिका निवडणुकीचे वेध लागलेले असताना पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपाला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही. पिंपरी चिंचवडमधील थेरगाव भागाच्या…

संजय गांधी निराधार योजनेसाठी 625 कोटी, श्रावणबाळसेवा राज्य निवृत्तीवेतनसाठी 1,194 कोटी रुपयांचा निधी

Posted by - October 7, 2022 0
मुंबई : संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ६२५ कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत १ हजार १९४ कोटी…
NCP ANDOLAN

भाजपाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पुणे महापालिका भवनाच्या बाहेर तीव्र आंदोलन ; ‘बोट दाखवेल तेथे बोटसेवा सुरू झालीच पाहिजे’

Posted by - September 13, 2022 0
पुणे : रविवारी संध्याकाळी पुण्यात मुसळधार पाऊस झाला होता. पावसाचा जोर एवढा होता कि अगदी काही मिनिटातच रस्ते जलमय झाले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *