Ajit Pawar

केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

4711 0

 

मुंबई, दि. 1 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचं हित जपणारा, देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, विकसित भारताची पायाभरणी करुन देशवासियांची मनं जिंकणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, आज लोकसभेत वर्ष 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प निवडणूक अर्थसंकल्प असेल अशी अपेक्षा होती. त्या अपेक्षांवर हा अर्थसंकल्प खरा उतरला असून विकसित भारताची पायाभरणी असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

उपमुख्यंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, या अर्थसंकल्पाने 2047 पर्यंतच्या विकसित भारताची पायाभरणी केली आहे. गरीब, महिला, युवक आणि अन्नदाता शेतकरी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी कॉर्पस फंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संशोधन व विकास या क्षेत्रांत नवीन उद्योग यावेत यासाठी ५० वर्षे कालावधीचे व्याजमुक्त अर्थसाह्य, त्यासाठी सरकार एक लाख कोटी रुपयांचा निधी तयार करणार तसेच राज्य सरकारांना आर्थिक सुधारणांसाठी ७५ हजार कोटी रुपयांचे ५० वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज देण्याची घोषणा, या सगळ्या बाबी राज्यांच्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहेत.

प्रधानमंत्री किसान योजनेतून 11 कोटी 80 लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत, 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीकविमा योजनेचा लाभ, आत्मनिर्भर तेलबिया अभियानांतर्गत मोहरी, तीळ, सूर्यफुल, शेंगदाणा, सोयाबीन या तेलबिया देशातच तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न, दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वंकष योजना, राष्ट्रीय गोकुल मिशनसारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना बळ मिळणार आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. देशात ३ हजार नवीन आयटीआय, ७ आयआयटी, १६ आयआयआयटी, ७ आयआयएम तसेच १५ एम्स आणि ३९० विद्यापीठांची घोषणा उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणारी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणारी त्यांना संधी देणारी आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

Share This News

Related Post

#PUNE : खासदार गिरीश बापट यांच्या धार्मिक विकास निधी मधून श्री कसबा गणपती मंदिराच्या प्रांगणात भित्तिचित्र शिल्पाचे लोकार्पण

Posted by - March 22, 2023 0
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या धार्मिक विकास निधी मधून श्री कसबा गणपती मंदिराच्या प्रांगणात भित्तिचित्र शिल्पाचे लोकार्पण राष्ट्रीय…
Nana Patole And Balasaheb Thorat

नाना पटोलेंची खुर्ची जाणार… नवीन प्रदेशाध्यक्ष कोण?

Posted by - May 27, 2023 0
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) लवकरच मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नाना…

ब्रेकिंग न्यूज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याची ६ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

Posted by - March 22, 2022 0
मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची ६ कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.…

“नवे आदर्श सांगणं हा महापुरुषांचा अपमान कसा…?” राज्यपालांचं अमित शाहांना पत्र…

Posted by - December 12, 2022 0
महापुरुषांबाबत अवमान करण्याची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. नवे आदर्श सांगणं हा महापुरुषांचा अपमान कसा काय? असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…

संपाच्या 72 तासांमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था पूर्णत्वास; पुणे परिमंडलामध्ये पर्यायी मनुष्यबळाद्वारे 24 तास सेवा राहणार

Posted by - January 3, 2023 0
पुणे : महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीने मंगळवारी (दि. ३) मध्यरा‍त्रीनंतर ७२ तासांचा संप पुकारला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *