कार्डियोफोबिया म्हणजे नेमकं काय.. ?

643 0

आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो, अशी कधी तरी भीती वाटणे ही एक सामान्य बाब आहे. मात्र, जर कुणी सतत अशा भीतीच्या छायेत वावरत असेल आणि प्रत्येक क्षणाला याबाबतचाच विचार करीत असेल तर त्याला ‘कार्डियोफोबिया’ असे म्हणतात. हा एक भयगंड असून, त्याने ग्रासलेल्या माणसाला सतत वाटत असते की, आपल्याला हार्ट अटॅक येणार..!

हा फोबिया एक प्रकारचा एंग्झयटी डिसऑर्डर आहे. आपल्या दैनंदिन जीवनात त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. सतत हार्ट अटॅकच्या भीतीच्या छायेत राहिल्याने कामात माणसाचे मन एकाग्र होऊ शकत नाही. या भयगंडाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके अनियमित झाले की तो आणखीच घाबरतो. छातीत किंवा खांद्यामध्ये वेदना झाल्यावर ही त्याला वाटते की आपल्याला हृदयविकार जडलेला आहे अनेक कारणांमुळे माणसाला कार्डियोफोबिया होऊ शकतो.

एखाद्या परिचिताचा किंवा आप्तस्वकीयाचा हार्ट अटॅकने मृत्यू होणे ही यामागील कारण असू शकते. तसेच लहानपणीच्या एखाद्या दुर्घटनेची कारणे यामध्ये असू शकतात. एंग्झयटी, हृदयाची धडधड वाढणे, भोवळ येणे, उच्च रक्तदाब, अचानक घाम येणे, कंप सुटणे, छातीत वेदना ही फोबियाची लक्षण आहेत. अर्थात ही लक्षणे खऱ्या हार्ट अटॅकवेळीही असू शकतात. त्यामुळे अशा वेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे गरजेचे ठरते. जर सर्व चाचण्या करूनही भय कायम राहत असेल तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. चांगल्या सायकॉलॉजिस्ट कडून थेरपी किंवा कौन्सिलिंगचा यासाठी लाभ होऊ शकतो.

 

Share This News

Related Post

Dhananjay Munde

Dhananjay Munde : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

Posted by - December 24, 2023 0
पुणे : राज्‍याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रकृतीच्या तक्रारीमुळे ते रूग्णालयात गेले हाेते. तेथे…
Maharashtra Rain

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Posted by - February 26, 2024 0
मुंबई : देशातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल (Weather Update) जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वी उन्हाचा तडाखा जाणवत असताना उत्तर भारतात हवामानाने…
Sinhgad Police Station

Pune News : जातिवाचक टोमणे दिल्याने पत्नीकडून पतीवर सिंहगड पोलिसांत गुन्हा दाखल

Posted by - December 4, 2023 0
पुणे : आपल्या विवाहित पत्नीला जातीवाचक टोमणे देणाऱ्या पतीविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात (Pune News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘तीन’ दैवी तलवारींचा इतिहास; त्या सध्या कुठे आहेत ?

Posted by - November 15, 2022 0
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक विराजमान झाल्यानंतर ब्रिटीश राजघराण्याच्या संग्रहात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा नावाची रत्नजडित तलवार महाराष्ट्राला…

डेंगी, चिकनगुनिया सारखे आजार थोपवण्यासाठी उपाययोजना करा ; सुनील माने यांचे सहआयुक्तांना निवेदन

Posted by - September 20, 2022 0
पुणे : औंध –बाणेर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या औंध, बाणेर, बालेवाडी,बोपोडी, चिखलवाडी, औंधरोड येथे सध्या डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या आजारांचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *